“कर्नाटकात काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल”; भाजप नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 10:01 AM2023-11-01T10:01:41+5:302023-11-01T10:04:40+5:30

Karnataka Politics: भाजप नेत्यांनी केलेले दावे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावले आहेत.

bjp leader ramesh jarkiholi claims that congress govt soon collapsed and situation may like uddhav thackeray maha vikas aghadi | “कर्नाटकात काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल”; भाजप नेत्याचा दावा

“कर्नाटकात काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल”; भाजप नेत्याचा दावा

Karnataka Politics: देशभरात विविध कारणांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. सर्व पक्ष तयारीला लागले असून, दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. यातच कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार लवकरच कोसळणार असून, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारप्रमाणे अवस्था होईल, असा दावा भाजप नेत्याने केला आहे. हा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळून लावला आहे. 

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळेल, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारसारखीच तिची अवस्था होईल. सरकारला बाहेरील कोणत्याही गोष्टीपेक्षा आतून धोका आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कंपनी या पडझडीला जबाबदार असतील, असे भाकित भाजपचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी वर्तवले आहे. याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

केवळ भाजप नेत्याने म्हटल्याने ते कोसळणे शक्य नाही

आमचे सरकार स्थिर आहे आणि केवळ भाजप नेत्याने म्हटल्याने ते कोसळणे शक्य नाही, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.  भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबत काँग्रेसने केलेले आरोप रमेश जारकीहोळी यांनी फेटाळून लावले आहे. तसेच २०१९ मध्ये भाजपने काँग्रेस-जेडीएसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नव्हता, असेही जारकीहोळी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजपने कधीही 'ऑपरेशन लोटस'बाबत काही चर्चा केली नाही. फक्त शिवकुमार यांची ड्रामा कंपनीच याबाबत दावे करते, अशी टीका त्यांनी केली. विशेष म्हणजे जारकीहोळी हे यापूर्वी काँग्रेससोबत होते. चार वर्षांपूर्वी काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते.


 

Web Title: bjp leader ramesh jarkiholi claims that congress govt soon collapsed and situation may like uddhav thackeray maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.