"...सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणं योग्य नाही"; Marital Rapeच्या मुद्द्यावर संसदेत स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:39 PM2022-02-02T19:39:49+5:302022-02-02T19:43:36+5:30

"वैवाहिक जीवनात लैंगिक हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पण...."

BJP leader Smriti Irani reply on the Demand to make law on marital rape in parliament | "...सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणं योग्य नाही"; Marital Rapeच्या मुद्द्यावर संसदेत स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी

"...सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणं योग्य नाही"; Marital Rapeच्या मुद्द्यावर संसदेत स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी

Next

देशात अनेक वेळा उपस्थित होणाऱ्या कथित मॅरिटल रेपच्या (Marital Rape) मुद्द्यावर सरकारने पुन्हा एकदा आपले मत स्पष्ट केले आहे. यासंदर्भात बुधवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.

'सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणे अयोग्य' -
संसदेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरील (Union Budget 2022) चर्चे दरम्यान स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या, वैवाहिक जीवनात लैंगिक हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पण, याच्या नावाखाली सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणेही योग्य नाही. तसेच, देशातील प्रत्येक लग्नाची निंदा करणेही योग नाही, असेही स्मृती इराणी म्हणाल्या.

'गरजू महिलांना दिली जातेय मदत' -
खरे तर, सीपीआय खासदार बिनॉय विश्वम (CPI MP Binoy Vishwam) यांनी बजेट सत्रादरम्यान 'वैवाहिक जीवनात लैंगिक हिंसाचार' यासंदर्भात एक प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या, सध्या महिलांशी संबंधित प्रकरणांत मदत करण्यासाठी संपूर्ण देशात 30 हून अधिक हेल्पलाइन कार्यरत आहेत. या हेल्पलाइन्सच्या माध्यमाने 66 लाख हून अधिक महिलांना मदत करण्यात आली आहे.

स्मृती म्हणाल्या, देशभरात 703 'वन स्टॉप सेंटर'देखील महिलांना मदत करत आहेत. यांच्या माध्यमाने 5 लाख महिलांना मदत करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर मॅरिटल रेप (Marital Rape)चे प्रकरण सुप्रीम कोर्टात विचाराधीन आहे. यामुळे यामुद्द्यावर सरकार अधिक चर्चा करू शकत नाही, असेही स्मृती यांनी सीपीआय खासदार बिनॉय यांना सांगितले. 

'विवाह संस्थाच नष्ट होईल' -
भाजप नेते सुशील मोदी यांनीही या चर्चेत भाग घेतला. जर सरकारने वैवाहिक बलात्कार गुन्ह्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला, तर विवाह संस्थाच नष्ट होईल, असे मोदी म्हणाले.

Web Title: BJP leader Smriti Irani reply on the Demand to make law on marital rape in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.