JNU Protest : दीपिका पादुकोण भारताचे तुकडे करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसोबत; स्मृती इराणींचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:28 PM2020-01-10T13:28:33+5:302020-01-10T13:56:49+5:30
JNU Protest : दीपिका पादुकोणच्या जेएनयू भेटीवर स्मृती इराणींचं टीकास्त्र
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतलेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोणवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणींनी टीका केली आहे. दीपिका राजकीयदृष्ट्या कोणाशी संबंधित आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे, असं इराणी एका कार्यक्रमात म्हणाल्या. ज्यांनी दीपिकाच्या जेएनयू भेटीची बातमी वाचली, त्यांना दीपिका आंदोलकांना भेटण्यासाठी का गेली हा प्रश्न पडला आहे, असं इराणी म्हणाल्या.
JNU Protest : जेएनयूत जाण्यापेक्षा दीपिकानं मुंबईत जाऊन नाचावं; भाजपा नेता बरळला
भारताचे तुकडे करू पाहणाऱ्यांसोबत, तरुणींच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करणाऱ्यांसोबत दीपिका उभी होती, याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. जेएनयूतील विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयू कॅम्पसमध्ये गेलेल्या दीपिकावर इराणींनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गांनी ट्विट केला आहे.
. @smritiirani takes down Deepika Padukone for supporting Bharat Tere Tukde Gang pic.twitter.com/XzqTmSjeaN
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 10, 2020
दीपिकानं जेएनयूतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं मला आश्चर्य वाटत नाही, असं इराणी म्हणाल्या. त्यांनी यामागचं कारणदेखील उपस्थितांना सांगितलं. दीपिका काँग्रेसशी संबंधित असल्याचा अप्रत्यक्ष दावा त्यांनी केला. आपण काँग्रेसचं समर्थन करत असल्याचं २०११ मध्ये दीपिकानं म्हटलं होतं. अनेकांना या गोष्टीची कल्पना नाही. त्यामुळेच मला दीपिकाच्या जेएनयू भेटीचं आश्चर्य वाटतं नाही, असं इराणी म्हणाल्या.
भाजपा नेता म्हणतो, दीपिका तुकडे-तुकडे गँगची समर्थक; तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला
यावेळी स्मृती इराणींना जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचं उत्तर त्यांनी दिलं. 'या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मी घटनात्मक पदावर आहे. त्यामुळे पोलीस तपास सुरू असताना आणि या तपासाची माहिती न्यायालयासमोर मांडली गेली नसताना यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही,' असं इराणींनी सांगितलं.