“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 03:59 PM2021-03-23T15:59:40+5:302021-03-23T16:04:47+5:30
Param Bir Singh Letter: या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत.
नवी दिल्ली :सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेले पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत. अशातच भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी आता नवा धक्कादायक दावा केला आहे. (bjp leader sushil kumar modi react on param bir singh letter)
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर व धक्कादायक आरोप केले आहेत. तसेच परमबीर सिंग यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. १३० पानी याचिकेत परमबीर सिंग यांनी आणखीन नवे दावे केले आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर नवनवीन दावे, खुलासे होऊनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर एक चकार शब्दही बोललेले नाहीत, यावरूनही विरोधकांनी टीका केली आहे. सुशील कुमार मोदी यांनीही याच मुद्द्यावरून मोठा दावा केला आहे.
एक अराजकता की स्थिति पैदा हो गई है और पूरी सरकार अनिल देशमुख को बचाने में लगी है। उद्धव ठाकरे के मन में डर है कि अगर अनिल देशमुख पर कार्रवाई की गई तो वो कहीं ऐसी बात न उगल दें जिसके कारण वो भी कल संकट में पड़ सकते हैं: सुशील मोदी, बीजेपी सांसद #Maharashtrapic.twitter.com/5Bm9hM6P94
— ANI_HindiNews (@AHindinews) March 23, 2021
काय म्हणतात सुशील कुमार मोदी?
अराजकता पसरल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. संपूर्ण महाविकास आघाडी सरकार अनिल देशमुख यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली, तर ते अशी एखादी गोष्ट बोलतील, ज्यामुळे संपूर्ण सरकार अडचणीत येईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे, असा दावा मोदी यांनी केला आहे.
अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला
देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहसचिवांना भेटणार
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंग प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पोलीस खात्यांमधील बदल्यासंदर्भातील घोटाळ्याचे पुरावे असतानाही कोणतीही कारवाई मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी केली नाही, असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी आता हे सर्व पुरावे केंद्रीय गृह सचिवांकडे देऊन CBI चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.
सत्ता जाणे हीच भाजपची दुखरी नस, आम्हाला नैतिकता शिकवू नये; शिवसेनेचा पलटवार
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.