"हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"

By ravalnath.patil | Published: September 27, 2020 09:34 AM2020-09-27T09:34:34+5:302020-09-27T09:46:01+5:30

कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती उमा भारती यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.

bjp leader uma bharti tests covid positive | "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"

"हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"

Next
ठळक मुद्दे दोन दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. 

नवी दिल्ली:  माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. उमा भारती यांनी ऋषिकेश आणि हरिद्वारमधील वंदे मातरम् कुंज या ठिकाणी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. 

हिमायल यात्रा संपण्याच्या शेवटच्या दिवशी मी प्रशासनाला आग्रह करून कोरोना टेस्टच्या टीमला बोलविले. कारण, मला ३ दिवस हलका येत ताप होता, असे उमा भारती ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे.

हिमालयात कोविड-१९ चे सर्व नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. तरीही कोरोनाची लागण झाली. सध्या वंदे मातरम् कुंज याठिकाणी क्वारंटाइन आहे. येथे कुटुंबीयांसारखे आहे. ४ दिवसांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करेन आणि त्यानंतर डॉक्टरांचा सल्ल्याने निर्णय घेईन, असे उमा भारती यांनी म्हटले आहे. याचबरोबर, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली कोरोना चाचणी करावी असे आवाहन सुद्धा उमा भारती यांनी ट्विट करून केले आहे.

दरम्यान, देशात कोरोना  व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दिवसाला ८५ हजारहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे. सर्व सामान्यांसह अनेक कलाकार, खेळाडू, नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. दोन दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. ते करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. 

आणखी बातम्या...

- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा

-  सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती     

- शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात

- CoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु        

Web Title: bjp leader uma bharti tests covid positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.