“देशात दररोज १४ लोकं आत्महत्या करतायत, ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 04:39 PM2022-02-18T16:39:16+5:302022-02-18T16:40:37+5:30

विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि ऋषि अग्रवालसारखे भ्रष्टाचारी आरामात जगत असून, कर्जाचा डोंगर झालेले देशवासी आत्महत्या करतायत.

bjp leader varun gandhi again criticised central modi govt over corruption in country | “देशात दररोज १४ लोकं आत्महत्या करतायत, ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा”

“देशात दररोज १४ लोकं आत्महत्या करतायत, ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा”

Next

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून भाजपवर नाराज असलेले नेते असलेले वरुण गांधी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ आणि केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. वरुण गांधी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, यातच आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

गुजरातमधील एबीजी शिपयार्ड घोटाळा उघड झाल्यानंतर आता वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाभ्रष्ट व्यवस्थावर एक ‘मजबूत सरकार’ नाही ‘मजबूत कार्यवाही’ची अपेक्षा असल्याचे वरुण गांधी यांनी म्हटले आहे. एक ट्विट करत वरुण गांधींनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

भ्रष्टाचारी लोक ऐशोआरामात जगत

विजय मल्ल्या ९ हजार कोटी, नीरव मोदी १४ हजार कोटी, ऋषि अग्रवाल २३ हजार कोटी अशी आकडेवारी देत, आज देशात दररोज सुमारे १४ जण कर्जाच्या ओझ्याखाली असलेले आत्महत्या करत असताना उपरोक्त धनवान लोकं वैभवाच्या शिखरावर आहे. या महाभ्रष्ट व्यवस्थेवर ‘मजबूत सरकार’ ऐवजी ‘मजबूत कार्यवाही’ करण्याची अपेक्षा आहे, असे वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान, उद्योगपती विजय मल्ल्यावर अनेक बँकाकडून घेतलेले ९ हजार कोटी कर्ज न चुकवल्याचा आरोप आहे. तसेच नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकमध्ये १४ हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचा आरोप आहे. नुकताच एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे माजी चेअरमन ऋषी अग्रवालचे नाव समोर आले आहे. अग्रवालने २२ हजार ८४२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे. 
 

Web Title: bjp leader varun gandhi again criticised central modi govt over corruption in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.