व्हिडीओ : मुख्यमंत्र्यांसमोरच भाजपाचे दोन नेते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 08:31 AM2018-09-23T08:31:08+5:302018-09-23T08:37:33+5:30
भाजपाचे दोन नेते आपापसातच भिडल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
अलवर - राजस्थानमध्येभाजपाचे दोन नेते आपापसातच भिडल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे ही उपस्थित होत्या. अलवारमधे एका सभेनिमित्त मुख्यमंत्री उपस्थित होत्या. त्याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या समोरच दोन नेत्यात हमरीतुमरीचे चित्र पाहायला मिळाले.
#WATCH: BJP leaders Rohitash Sharma & Devi Singh Shekhawat fight in presence of CM Vasundhara Raje during an event in Alwar, following which Shekhawat was brought down from stage by the CM's security personnel. The two leaders blamed each other of misbehaving on stage. #Rajasthanpic.twitter.com/VNYhD8kS6E
— ANI (@ANI) September 22, 2018
मुख्यमंत्री वसुंधरा राजे गौरव यात्रेनिमित्त अलवारमध्ये आल्या होत्या. व्यासपीठावर त्यांचे भाषण सुरू असताना रोहिताश शर्मा आणि देवी सिंह शेखावत या दोन भाजपा नेत्यांमध्ये वाद सुरू झाला. पुढे या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. दोघांनी एकमेकांवर अपमानास्पद वागणुकीचा आरोप केला आहे. आपल्याच पक्षाचे नेते भर सभेत आपापसात भांडतात हे पाहून मुख्यमंत्र्यांनी आपल्या सुरक्षा कर्मचार्यांना शेखावत यांना व्यासपीठावरून दूर नेण्यास सांगितले. सुरक्षाकर्मचार्यांनी शेखावत यांना मंचापासून दूर नेले पण शेखावत मात्र तरीही भांडत होते.