भाजपा नेत्याच्या मुलाने वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केल्याची कबुली दिली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 11:44 AM2017-08-10T11:44:28+5:302017-08-10T11:48:36+5:30

हरयाणातील भाजपाचे वजनदार नेते सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालाने (23) पोलीस चौकशीत वर्णिका कुंडूच्या गाठीचा पाठलाग केल्याची कबुली दिली आहे.

The BJP leader's son admitted to the charioteer's car? | भाजपा नेत्याच्या मुलाने वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केल्याची कबुली दिली ?

भाजपा नेत्याच्या मुलाने वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केल्याची कबुली दिली ?

Next
ठळक मुद्दे शुक्रवारी रात्री विकास बराला आणि त्याचा मित्र आशिषने काही किलोमीटर अंतरापर्यंत वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केला होता. तिने फेसबुकवर या थरारक घटनेची पोस्ट लिहील्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

चंदीगड, दि. 10 - हरयाणातील भाजपाचे वजनदार नेते सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालाने (23) पोलीस चौकशीत वर्णिका कुंडूच्या गाठीचा पाठलाग केल्याची कबुली दिली आहे. एनडीटीव्ही वाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. सध्या संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजत असून, भाजपावर आपल्या नेत्याला पाठिशी घालण्याचा आरोप होत आहे. 

मागच्या आठवडयात शुक्रवारी रात्री विकास बराला आणि त्याचा मित्र आशिषने काही किलोमीटर अंतरापर्यंत वर्णिकाच्या गाडीचा पाठलाग केला होता. वर्णिका एका आयएएस अधिका-याची मुलगी असून, तिने फेसबुकवर या थरारक घटनेची पोस्ट लिहील्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.  पोलिसांनी बुधवारी विकास बराला आणि त्याच्या मित्राला अटक केली. त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याआधीही विकासला अटक केली होती. मात्र त्यांच्यावर गुन्हा नोंद केला नसल्याने न्यायालयात हजर न करताच जामीन मंजूर करण्यात आला होता.

विकासचे वडिल आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष सुभाष बरला यांनी यासंबंधी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला मुलगा विकास पोलिसांना तपासात संपुर्ण सहकार्य करेल, तसंच दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. पत्रकार परिषद सुरु असतानाच मुलगा विकासचा फोन आल्याने सुभाष बराला पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून निघून गेले. 

पत्रकार परिषदेदरम्यान सुभाष बराला यांनी सांगितलं की, 'आम्ही याप्रकरणी कोणतंही राजकारण केलं नसून, कोणताही दबाव टाकलेला नाही. जे आरोप लावण्यात येतील त्यानुसार कारवाई होईल. वर्णिका मुंडू माझ्या मुलीसारखी आहे. जर माझा मुलगा दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पोलिसांकडून कोणताही निष्काळजीपणा केला जात नसून योग्य कारवाई केली जात आहे'. 

काय आहे प्रकरण -
हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्यावर एका मुलीचा पाठलाग व छेडछाड केल्याचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्षांचा मुलगा कायद्याचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी आयएएस अधिका-याची मुलगी आहे. शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून चालली होती. तेव्हा एक टाटा सफारी कार पाठलाग करीत आहे, असे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पोलिसांनी दोघांना अटक केली, तेव्हा ते दोघेही दारूच्या नशेमध्ये होते. हरिणाया भाजपाध्यक्ष सुभाष बराला यांनी दिल्लीतल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं. 
 

Web Title: The BJP leader's son admitted to the charioteer's car?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.