महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हेगडेंना भाजप नेतृत्वाकडून नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:38 AM2020-02-04T11:38:32+5:302020-02-04T11:38:55+5:30

महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य सहन केले जाणार नाही, अशी भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे समजते.

BJP leadership noticesTO Hegade who makes controversial statement about Mahatma Gandhi | महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हेगडेंना भाजप नेतृत्वाकडून नोटीस

महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हेगडेंना भाजप नेतृत्वाकडून नोटीस

Next

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपनेते आणि खासदार अनंतकुमार हेगडे यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कर्नाटक भाजपचे प्रमुख नलिन कुमार कटील यांनी ही माहिती दिली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हेगडे यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतल्याचे ते म्हणाले. 

हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. महात्मा गांधी यांनी इंग्रजांसबोत करार केला होता. ज्या स्वतंत्र सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले नाही त्यांनी केवळ सत्यागृह करून स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा दावा केला आहे. त्यावरच ते महापुरुष बनल्याचे हेगडे यांनी म्हटले होते. बंगळुरू येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

दरम्यान हेगडे यांच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेगडे यांना जाहीर माफी मागावी लागू शकते. पक्षाच्या सुत्रांनी या संदर्भात माहिती दिली. तसेच महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य सहन केले जाणार नाही, अशी भूमिका पक्ष नेतृत्वाने घेतल्याचे समजते.

Web Title: BJP leadership noticesTO Hegade who makes controversial statement about Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.