तिसऱ्या टर्मसाठी नवीन टीमसह मैदानात उतरणार पीएम मोदी, 70 खासदारांना मिळणार डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 02:26 PM2024-03-01T14:26:53+5:302024-03-01T14:28:10+5:30

आगामी लोकसभा निवडणुकी खराब कामगिरी करणाऱ्या भाजपाच्या अनेक खासदारांना तिकीट नाकारले जाणार आहे.

BJP LokSabha Election 2024: PM Modi will enter the election with a new team for the third term | तिसऱ्या टर्मसाठी नवीन टीमसह मैदानात उतरणार पीएम मोदी, 70 खासदारांना मिळणार डच्चू

तिसऱ्या टर्मसाठी नवीन टीमसह मैदानात उतरणार पीएम मोदी, 70 खासदारांना मिळणार डच्चू

BJP LokSabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. काल, म्हणजेच 29 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिनीची बैठक पार पडली, ज्यात भाजप उमेदवारांच्या नावावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यंदा भाजपा अनेक खासदारांची तिकिटे कापण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने भाजप खासदारांकडून त्यांच्या कामाचा अहवाल मागवला जात होता. या अहवालाच्या आधारे अनेकांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

60-70 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाणार

सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अशा परिस्थितीत ज्या खासदारांची कामगिरी चांगली नाही, त्यांची तिकिटे इतर उमेदवारांना दिली जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा भाजपाच्या 60-70 विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. तीनदा विजयी झालेल्या अनेक जुन्या खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. गेल्यावेळीप्रमाणे यंदाही अनेक ओबीसी खासदारांना तिकीट दिले जाणार आहे. 2019 मध्ये भाजपचे 303 पैकी 85 ओबीसी खासदार विजयी झाले होते. 

प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा सर्व्हे
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने भाजप खासदारांकडून त्यांच्या कामाचा अहवाल मागवला जात होता. सर्वेक्षण संस्थांद्वारे प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची रिपोर्ट तयार करण्यात आली. भाजपशासित राज्यांमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राज्यातील मंत्र्यांना ड्युटी लावण्यात आली होती. या मंत्र्यांना लोकसभेच्या जागांना भेट देऊन खासदारांचा अहवाल घेण्यास सांगण्यात आले होते. मंत्री व संघटनेकडून प्राप्त झालेला अहवाल राज्यस्तरावरील निवडणूक समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. यासोबतच संघाच्या सरचिटणीसांकडून आरएसएसचा अभिप्रायही देण्यात आला.

जागेनुसार रणनीती तयार केली
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी गुरुवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची दीर्घ बैठक झाली. या बैठकीत उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राज्यनिहाय उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. भाजपने प्रत्येक जागेनुसार रणनीती तयार केली आहे. प्रत्येक जागा जिंकण्यासाठी सर्वोत्तम उमेदवार कोण असू शकतो, हे पाहिले जात आहे. दुसऱ्या पक्षातील उमेदवारांना भाजपमध्ये आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले. सर्व बाजूने विचार करुन कोणत्याही क्षणी भाजपा आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते.

Web Title: BJP LokSabha Election 2024: PM Modi will enter the election with a new team for the third term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.