२०२६ मध्ये भाजपला राज्यसभेत बहुमत? २०२४-२६ मधील सर्व निवडणुका जिंकाव्या लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:30 PM2024-09-05T13:30:48+5:302024-09-05T13:31:08+5:30

BJP News: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यसभेत भलेही कामापुरते बहुमत मिळाले आहे. पण, राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळविणे हे भाजपसाठी मृगजळ ठरत आहे. भाजपला राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील म्हणजे, २०२६ पर्यंतचा कालावधी लागेल. 

BJP majority in Rajya Sabha in 2026? All the elections in 2024-26 have to be won | २०२६ मध्ये भाजपला राज्यसभेत बहुमत? २०२४-२६ मधील सर्व निवडणुका जिंकाव्या लागणार

२०२६ मध्ये भाजपला राज्यसभेत बहुमत? २०२४-२६ मधील सर्व निवडणुका जिंकाव्या लागणार

- हरीश गुप्ता 
नवी दिल्ली - भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यसभेत भलेही कामापुरते बहुमत मिळाले आहे. पण, राज्यसभेत स्वबळावर बहुमत मिळविणे हे भाजपसाठी मृगजळ ठरत आहे. भाजपला राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतील म्हणजे, २०२६ पर्यंतचा कालावधी लागेल. 

सध्या राज्यसभेत भाजपचे ९६ सदस्य आहेत. जम्मू- काश्मीरमधील निवडणुकीनंतर पक्षाची सदस्यसंख्या दोनने वाढू शकते. कारण, जम्मू-काश्मीरमधून राज्यसभेचे ४ खासदार निवडून येतील. या सभागृहातील सदस्य संख्या वाढविण्यासाठी भाजपला २०२४-२६ या काळातील महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, बिहार  आणि दिल्ली या राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकाव्या लागतील. तामिळनाडूत २०२५ मध्ये सहा जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक  होणार आहे. मात्र, या राज्यात भाजपला यश मिळण्याची शक्यता कमी आहे. आंध्रप्रदेशातील पोटनिवडणुकीनंतर भाजपचा आकडा एकने वाढू शकतो. सध्या राज्यसभेत २४५ पैकी २३७ सदस्य आहेत.

सध्या काय?
- २०२६ मध्ये राज्यसभेच्या ७२ जागांसाठी निवडणुका होतील तेव्हा भाजपचे संख्याबळ वाढू शकेल. बहुसंख्य राज्यांत भाजप सत्तेत आहेत.
- पण, स्वबळावर १२२ जागांसह बहुमत मिळवायचे असेल तर भाजपला सर्व राज्यातील निवडणुका जिंकाव्या लागतील.
- एनडीए सत्तेत असलेल्या राज्यात छोट्या आणि प्रादेशिक पक्षाच्या खासदारांना त्या पक्षापासून फोडून नंतर पोटनिवडणुकीत त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडून आणण्यात पक्षाला यश आले आहे.

हरयाणासाठी ६७ उमेदवारांची यादी जाहीर
हरयाणा विधानसभेसाठी भाजपने ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना लाडवातून उमेदवारी दिली आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकर यांना बदलीमधून, दिग्गज नेते अनिल विज यांना अंबालामधून तिकिट दिले आहे.
केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह यांची मुलगी आरती सिंह राव अटेलीमधून लढवणार आहेत. कुलदीप बिश्नोई यांचा मुलगा भव्य बिश्नोई, कॅप्टन अभिमन्यू, माजी खासदार सुनीता दुग्गल यांचीही नावे यादीत आहेत.
शक्ती रानी शर्मा, ज्ञानचंद गुप्ता, राम कुमार गौतम, डॉ. कृष्ण लाल मिड्ढा, देवेंद्र अत्री, देवेंद्र सिंह बबली, डुडा राम बिश्नोई, राजिंदर देशुजोधा, श्रुती चौधरी, दीपक हुडा, मंजू हुडा, रेनू डाबला यांच्या नावांचाही समावेश आहे.

Web Title: BJP majority in Rajya Sabha in 2026? All the elections in 2024-26 have to be won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.