भाजपचा 'मेगा प्लॅन'! 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी 'या' पक्षांसोबत करणार युती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 01:59 PM2023-01-20T13:59:58+5:302023-01-20T14:00:46+5:30

भाजपने नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP)सोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

bjp mega plan for north east assembly election 2023 opposition will lose ground | भाजपचा 'मेगा प्लॅन'! 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी 'या' पक्षांसोबत करणार युती

भाजपचा 'मेगा प्लॅन'! 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी 'या' पक्षांसोबत करणार युती

Next

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील (North East India) तीन राज्यांतील मेघालय (Meghalaya), नागालँड (Nagaland) आणि त्रिपुरा (Tripura) या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रिंगणात उतरण्यापूर्वी भाजपने (BJP) खास रणनीती आखली आहे. 
भाजपने नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP)सोबत युती करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

60 जागांच्या नागालँड विधानसभेत भाजप 20 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तर, नागालँडच्या उर्वरित 40 जागांवर एनडीपीपी, जे एनईडीएचा घटक म्हणजेच नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सच्या उमेदवारांना तिकीट मिळेल. मेघालय आणि त्रिपुरा निवडणुकीसाठी भाजपचीही खास योजना आहे.

मेघालयसाठी भाजपचा खास प्लॅन
यावेळी भाजप मेघालयमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. येथील एनईडीएच्या घटक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने आधीच युतीशिवाय निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, 2018 च्या निवडणुकीनंतर मेघालयमध्ये 6 पक्षांची युती झाली होती, ज्याच्या मदतीने सरकार 5 वर्षे टिकले. या आघाडी सरकारमध्ये भाजपच्या दोन आमदारांचाही समावेश होता.

त्रिपुरामध्ये युती संदर्भात भाजपची चर्चा
दुसरीकडे, त्रिपुरामध्ये नवीन पार्टी टिप्रा मोथासोबत युती करण्याची भाजपची चर्चा सुरू आहे. पण टिप्रा मोथाचे नेते प्रद्युत देबबर्मा म्हणाले की, जर भाजप किंवा कोणत्याही राष्ट्रीय पार्टीने त्यांना टिप्रा मोथा लँडचे लेखी आश्वासन दिले तर ते त्या पार्टीशी युती करण्यास तयार आहेत.

हिमंता बिस्वा सरमा आणि प्रद्युत देबबर्मा यांच्यात बैठक
विशेष म्हणजे या मुद्द्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि प्रद्युत देबबर्मा यांच्यात दिल्लीत बैठकही झाली आहे. टिप्रा मोथा यांना आधीच सीपीएमकडून युतीचा प्रस्ताव आला आहे, परंतु पक्षाचे नेते प्रद्युत देबबर्मा यांनी सीपीएमचा प्रस्ताव नाकारला आहे. दरम्यान, ईशान्य भारतात भाजप आपली पकड कायम ठेवण्यासाठी आणि विरोधकांचा पराभव करण्यासाठी जोरदार रणनीती आखत आहे. तिन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, तेथेही युतीबाबत चर्चा झाली आहे की, त्यावर चर्चा सुरू आहे.

Web Title: bjp mega plan for north east assembly election 2023 opposition will lose ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.