"तर संपूर्ण भारतात इस्लामिक कायदा लागू होईल"; भाजपाच्या गिरिराज सिंह यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 12:59 PM2023-12-23T12:59:09+5:302023-12-23T13:13:10+5:30
केंद्र सरकारचे मंत्री असं का म्हणाले, वाचा सविस्तर
Giriraj Singh Reaction on Scrapping Of Hijab Ban In Karnataka : कर्नाटकात हिजाब बंदीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाबवरील बंदी हटवण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशा परिस्थितीत महिला हिजाब घालून बाहेर जाऊ शकतात असे सांगण्यात आले. या संदर्भातील आदेश मागे घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पण या निर्णयावर राजकारण सुरू झाले आहे असून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
गिरिराज सिंह म्हणाले की, हा निर्णय केवळ हिजाबवरील बंदी हटवण्यापुरता मर्यादित नाही, तर हा राज्यात शर्रिया कायदा प्रस्थापित करण्याबाबत आहे. देशात राहुल गांधी, काँग्रेस आणि INDI यांचे आघाडीचे सरकार बनले तर संपूर्ण देशात इस्लामिक कायदा लागू होईल, असे मोठे विधानही त्यांनी केले.
त्याच वेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही सीएम सिद्धरामय्या यांच्या हिजाबच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. येडियुरप्पा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मुस्लिम समुदायाला खूश करण्यासाठी घेतला आहे, तो त्यांनी तात्काळ मागे घ्यावा. लोकसभा निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल.
कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या निर्णयाला दुर्दैवी म्हटले आहे. सिद्धरामय्या शांतीच्या बागेत धर्माचे विष पेरत असल्याचे ते म्हणाले. राज्यात तुष्टीकरणाचे राजकारण करून धार्मिक आधारावर तरुणांमध्ये फूट पाडली जात आहे. यासोबतच त्यांनी फुटीरतावादी कारवाया करण्याऐवजी सरकारने शिक्षणावर भर द्यावा, असेही म्हटले आहे.
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्रियांक खर्गे यांचे म्हणणे आहे की, कर्नाटक सरकार जे काही करत आहे ते कायद्यानुसारच आहे. भाजपकडे कोणतेच काम नसल्याची त्यांनी टीका केली.