"कोण चालवतय महाराष्ट्राचा शो? राज्यात महाविकास अघाडी नव्हे, महावसुली सरकार चाललंय!"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 05:56 PM2021-03-23T17:56:56+5:302021-03-23T18:00:09+5:30

प्रसाद म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिने, हे भारताच्या इतिहासात,  पहिल्यांदाच घडले आहे. (Parambir Singh)

BJP minister Ravishankar Prasad questions Maharashtra government over Anil Deshmukh corruption charges | "कोण चालवतय महाराष्ट्राचा शो? राज्यात महाविकास अघाडी नव्हे, महावसुली सरकार चाललंय!"

"कोण चालवतय महाराष्ट्राचा शो? राज्यात महाविकास अघाडी नव्हे, महावसुली सरकार चाललंय!"

Next

नवी दिल्ली/मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Letter) यांच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपावरून उद्धव ठाकरे सरकारला घेरले आहे. याच वेळी, अखेर महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण? असा सवाल करत, राज्यात महाविकास अघाडी नव्हे, तर महावसुली सरकार चालवले जात आहे, असेही प्रसाद यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (BJP minister Ravishankar Prasad questions Maharashtra government over Anil Deshmukh corruption charges)

"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

प्रसाद म्हणाले, 'राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिने, हे भारताच्या इतिहासात,  पहिल्यांदाच घडले आहे. जर एका मंत्र्याचे टार्गेट 100 कोटी रुपये आहे, तर इतर मंत्र्यांचे किती असेल?' असा सवाल करत प्रसाद म्हणाले, शरद पवारांनीअनिल देशमुखांचा बचाव केला आहे. जो खोटा ठरला. जर पवारांना त्यांची विश्वसनियता सिद्ध करायची इच्छा असेल तर, त्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा.

'यापूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दस्तऐवजांच्या आधारे, बदली आणि पोस्टिंगच्या नावावर वसुली सुरू होती. तीही छोट्या-मोठ्या अधिकाऱ्याचीच नव्हे तर मोठ-मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांची,' असेही प्रसाद म्हणाले.

15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंवर निशाणा -
रविशंकर प्रसाद म्हणाले, 'मुख्यमंत्री ठाकरे यावर कारवाई करतील, अशी आशा होती. मात्र, असे होताना दिसत नाही. दोषींवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांची बदली केली. यावेळी प्रसाद यांनी महाविकास अघाडी सरकारला प्रश्नही केला आहे, की ही कथित वसुली सरकारसाठी होती, की आघाडीतील पक्षांसाठी (शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस) होती.

शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार -
भाजप खासदार गिरीश बापट यांनीही गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्य दडवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते शक्य नाही. कारण प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून ही सर्व माहिती समोर येईल. येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि दुराचार बोकाळला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही. हे गंभीर आहे. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी मागणीही बापट यांनी केली आहे.

'क्वारन्टाइन'वरून अनिल देशमुख अडचणीत; १५ फेब्रुवारीच्या 'त्या' नागपूर-मुंबई विमान प्रवासावर दिलं 'स्पष्टीकरण'

Web Title: BJP minister Ravishankar Prasad questions Maharashtra government over Anil Deshmukh corruption charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.