मुस्लिमांच्या घरी जाण्यास भाजप मंत्र्यांचा नकार; म्हणाले उपद्रवींच्या घरी मी का जाऊ ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 10:47 AM2019-12-27T10:47:35+5:302019-12-27T10:48:44+5:30

नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता विधेयक यावरून अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या अंतर्गत 43 लोकांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली आहे. 

BJP ministers refuse to go to Muslim homes | मुस्लिमांच्या घरी जाण्यास भाजप मंत्र्यांचा नकार; म्हणाले उपद्रवींच्या घरी मी का जाऊ ?

मुस्लिमांच्या घरी जाण्यास भाजप मंत्र्यांचा नकार; म्हणाले उपद्रवींच्या घरी मी का जाऊ ?

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात नागरिकता संशोधन कायद्याला जोरदार विरोध दर्शविण्यात येत आहे. यातून अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन झाले असून त्याला हिंसक वळण लागले होते. या पार्श्वभूमीवर बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेनंतर उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री कपिल देव हिंसा पीडितांना भेट देण्यास गेले होते. यावेळी त्यांनी मुस्लिमांच्या घरी जाण्यास नकार दिला.

योगी सरकारमधील मंत्री देव, गुरुवारी हिंसा पीडितांची चौकशी कऱण्यासाठी गेले होते. 20 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसेत दोघांचा मृत्यू झाला होता. यावेळी मृतांच्या घरी जाणार का, असा प्रश्न देव यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, मी उपद्रवी लोकांच्या घरी का जावू ? मी तिथे का जायला हवं ? जे हिंसा करत आहेत, ते समाजाचा भाग कसा होऊ शकतात  असा सवाल करत त्यांनी हा हिंदू मुस्लीमचा मुद्दा नाही, असंही म्हटले. 

नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता विधेयक यावरून अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. बिजनोरमध्ये झालेल्या हिंसेचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. या अंतर्गत 43 लोकांना आतापर्यंत नोटीस बजावण्यात आली आहे. 
 
Web Title: BJP ministers refuse to go to Muslim homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.