भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत आहे - राहुल गांधी
By admin | Published: March 14, 2017 01:26 PM2017-03-14T13:26:49+5:302017-03-14T13:31:56+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गोवा आणि मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपा दावा करत असलेल्या प्रश्नावर बोलताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा सत्तेसाठी पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. 'गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाने किती लवकर निर्णय घेतला यापेक्षा किती पैसा ओतला हे महत्वाचं आहे', असं राहुल गांधी बोलले आहेत.
निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी बोललेत की, 'पाचपैकी दोन राज्यांमध्ये भाजपाचा तर तीन राज्यांमध्ये आमचा विजय झाला आहे. आम्ही जिंकलेल्या राज्यांमध्ये पैसा आणि आर्थिक ताकदीचा वापर करत लोकशाहीला हिरावण्याचा प्रयत्न सुरु आहे'. 'आम्ही विरोधी पक्षात आहोत. प्रत्येकाला चढ उतार पाहावे लागतात, आम्ही मान्य करतो की उत्तप्रदेशात थोडा उतार पाहावा लागला', अशी कबुली राहुल गांधींनी दिली आहे.
#WATCH: Rahul Gandhi says, "We are in opposition,you have ups & downs, we had a little down in UP, its fine we accept that" #ElectionResultspic.twitter.com/6kj43gXzA1
— ANI (@ANI_news) March 14, 2017
यावेळी राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये रचनात्मक बदल करण्याची गरज असल्याचंही सांगितलं आहे. गोव्यात राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं असल्याने आम्हाला दावा करणं कठीण जाणार असल्याचं राहुल गांधी बोलले आहेत.
'भाजपाच्या विचारसरणीविरोधात आमचा लढा सुरु आहे. जे गोवा आणि मणिपूरमध्ये केलं जात आहे ती त्यांची विचारसरणी आहे, ज्याच्याविरोधात आम्ही लढा देत आहोत', असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.