भाजपा आमदारने लॉकडाऊनचा नियम मोडला, नवाजुद्दीकीनला घरी जाऊन भेटला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:43 PM2020-05-20T15:43:20+5:302020-05-20T15:44:06+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

The BJP MLA broke the lockdown rule and went home to meet Nawazuddin MMG | भाजपा आमदारने लॉकडाऊनचा नियम मोडला, नवाजुद्दीकीनला घरी जाऊन भेटला

भाजपा आमदारने लॉकडाऊनचा नियम मोडला, नवाजुद्दीकीनला घरी जाऊन भेटला

Next

मुजफ्फरनगर - रमजान ईद असल्याने नवाझुद्दीन त्याच्या कुटुंबियांसोबत उत्तरप्रदेशमधील मुझ्झफरनगरमध्ये ईद साजरी करण्यासाठी गेला आहे. यासाठी त्याने खास महाराष्ट्र सरकारची परवानगी घेतली आहे. एसपी देहात नेपाल सिंहने अमर उजालाला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नवाझुद्दीन त्याच्या कुटुंबियांसोबत बुढाना येथील त्याच्या घरी पोहोचला आहे. त्यानंतर, त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, तरीही येथील भाजपाआमदाराने नवाजुद्दीकीनची घरी जाऊन भेट घेतली. भाजपाआमदाराने लॉकडाऊनचा नियम मोडून नवाजला बर्थ डे शुभेच्छा दिल्या. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकतीच एका बॉलिवूडमधील सेलिब्रेटीची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याला त्याच्या घरात क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातून आपल्या मूळ गावी गेलेल्या नवाझुद्दीन सिद्दीकीची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे. चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना सध्या घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. मंगळवारी नवाजचा ४६ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अचानक त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपा आमदार उमेश मलिक आणि एसडीएम लाव-लश्कर नवाजच्या घरी पोहोचले. या भेटीनंतर जिल्ह्यात चर्चा सुरु असून आमदाराने आणि एसडीएमनेच लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा आहे. या भेटीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नवाजच्या घरी आमदार आणि अधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांसह चहा-नाश्ताही केला. विशेष म्हणजे नवाजच्या घराबाहेर डू नॉट व्हिसीट अशी नोटीस चिकटविण्यात आली आहे. तरीही, या महोदयांनी नवाजच्या घरी प्रवेश केला. त्यावरुन, स्थानिक परिसरात लॉकडाऊन नियम्मांचे उल्लंघन केल्याची चर्चा आहे. सध्या नवाजुद्दीकीनला २५ मे पर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, मी केवळ नवाजुद्दीकीनच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, मी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे आमदार उमेश मलिक यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, नवाझुद्दीन सिद्दीकीने आज त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे. नवाजुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नव्हता. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्ये दिसला.

Web Title: The BJP MLA broke the lockdown rule and went home to meet Nawazuddin MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.