VIDEO : फाटलेला कुर्ता अन् रस्त्यावर गोंधळ, भाजपा आमदाराने केला एसपींवर मारहाणीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 05:52 PM2021-04-07T17:52:33+5:302021-04-07T18:00:24+5:30

bjp mla dheeraj ojha said sp beat him in office at pratapgarh in uttar pradesh : धीरज ओझा प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज येथील भाजपाचे आमदार आहेत.

bjp mla dheeraj ojha said sp beat him in office at pratapgarh in uttar pradesh | VIDEO : फाटलेला कुर्ता अन् रस्त्यावर गोंधळ, भाजपा आमदाराने केला एसपींवर मारहाणीचा आरोप

VIDEO : फाटलेला कुर्ता अन् रस्त्यावर गोंधळ, भाजपा आमदाराने केला एसपींवर मारहाणीचा आरोप

Next
ठळक मुद्देफाटलेल्या कपड्यांमध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आले.

प्रतापगड - उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार धीरज ओझा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांनी (एसपी) त्यांना कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप करत भाजपा आमदार फाटलेला कुर्ता दाखवत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये आमदार रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत आणि आजूबाजूला लोकांची गर्दी दिसून येत आहे. (bjp mla dheeraj ojha said sp beat him in office at pratapgarh in uttar pradesh)

राणीगंज मतदारसंघाचे आमदार आहेत धीरज ओझा...
धीरज ओझा प्रतापगड जिल्ह्यातील राणीगंज येथील भाजपाचे आमदार आहेत. जेव्हा आमदार गोंधळ घातला होते, तेव्हा घटनास्थळी पोलिसांची उपस्थिती देखील दिसून येते. व्हिडिओमध्ये आमदार धीरज ओझा जोरात ओरडताना दिसत आहेत.

भाजपाचे आमदार धीरज ओझा यांनी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर धरणे आंदोलन केले. तसेच, आमदारांनी जमिनीवर पडून गोंधळ घातला. तसेच, मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप या भाजपाच्या आमदाराने केला. फाटलेल्या कपड्यांमध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आले.

दरम्यान, मतदार यादीमध्ये नाव जोडण्यासाठी भाजपाचे आमदार जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर आंदोलन करत होते. यावेळी निवासस्थानाजवळ जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकक्षक उपस्थित होते. हे प्रकरण प्रतापगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे आहे.

नितीन राऊतांचा योगी आदित्यनाथांवर निशाणा
काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपा आमदार धीरज ओझा यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. "ही सामान्य व्यक्ती नसून यूपीचे भाजपाचे आमदार धीरज ओझा आहेत. डीएमकडे तक्रार घेऊन गेले असता एसपींनी त्यांना मारहाण केली की, त्यांच्या शरीरावर कपडा शिल्लक राहिला नाही. यूपीमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु आहे, असे आदित्यनाथ सांगतात. काय हे देखील चांगले आहे?" असा सवाल नितीत राऊत यांनी ट्विटद्वारे केला आहे.

Web Title: bjp mla dheeraj ojha said sp beat him in office at pratapgarh in uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.