बलात्काराचा आरोप असलेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्या भावास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 09:33 AM2018-04-10T09:33:08+5:302018-04-10T09:56:39+5:30
बलात्काराच्या आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्या भावाला पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. कुलदीप सिंग सेनगर यांनी आपल्यावर बलात्ताक केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. त्यातच पीडित तरुणीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने या प्रकरणावरून वातावरण तापले होते.
लखनौ - बलात्काराच्या आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांचा भाऊ अतुल सिंह याला पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. कुलदीप सिंग सेनगर यांनी आपल्यावर बलात्ताक केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. त्यातच पीडित तरुणीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने या प्रकरणावरून वातावरण तापले होते. या प्रकरणी सरकारने तातडीने कारवाई करत सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. तसेच 4 जणांना अटक केली होती. दरम्यान, आपल्या वडलांना मारहाण झाल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता.
Lucknow: Atul Singh, brother of BJP MLA Kuldeep Sengar has been arrested in connection with death of Unnao rape victim's father in jail. Three other people have also been arrested.
— ANI UP (@ANINewsUP) April 10, 2018
उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या युवतीच्या वडिलांना पोलिसांनी रविवारी अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना त्यांच्या पोटात दुखायला लागले व उलटीही झाली. त्यामुळे रविवारी रात्री त्यांना पोलिसांनी उन्नाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात कुलदीप सिंह यांचा भाऊ अतुल सिंह याला क्राइम ब्रँच ने अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. मात्र पीडित महिलेने कुलदीप सिंह यांच्या अटकेची मागणी केली आहे.
Kuldeep Singh (Sengar) isn't being arrested. I don't know if his brother is arrested. I demand that they be hanged till death. They've made my life miserable. I want justice. They killed my father: Woman who has leveled rape allegations against BJP MLA Kuldeep Singh Sengar #Unnaopic.twitter.com/fHJBcjrj52
— ANI UP (@ANINewsUP) April 10, 2018
वडिलांच्या मृत्यूमुळे आता या सर्व प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यांना कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण असल्याचा संशय आहे. ज्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, त्याच्या भावाच्या सांगण्यावरून पोलिसांनी वडिलांना मारहाण केली, असा नातेवाइकांचा आरोप केला होता
सेनेगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणा-या युवती व तिच्या घरातील काही महिलांनी रविवारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला होता. त्या वेळी तिच्या कुटुंबातील काही मंडळींनीही निदर्शने केली होती. या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. सेनगर यांना मात्र हे आरोप मान्य नाहीत. आपल्या राजकीय विरोधकांनी रचलेले हे कारस्थान आहे, असा त्यांचा दावा आहे.