होळीचा रंग बेरंग ! भाजपा आमदारावर गोळीबार, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:06 PM2019-03-21T17:06:30+5:302019-03-21T17:07:29+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लखीमपूर मतदारसंघातून योगेश वर्मा यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील भाजपाआमदार योगेश वर्मा यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. पक्षाच्या कार्यालयात होळीच्या रंगांचे सेलिब्रेशन करताना झालेल्या वादावरुन त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये, त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे होळीचा रंग बेरंग झाला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लखीमपूर मतदारसंघातून योगेश वर्मा यांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. कदाचित, त्यावरुनच हा वाद टोकाला गेल्याचं समजते. या घटनेनंतर योगेश वर्मा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. या घटनेमुळे वर्मा यांचा चांगलाच धक्का बसला असून याबाबत कुठलिही प्रतिक्रिया देण्याची मनस्थिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. लखीमपूर खेरीचे जिल्हाधिकारी एस. सिंग यांनी याबाबत माहिती दिली, तसेच तपास सुरू असल्याचेही सांगितले.
S Singh, DM Lakhimpur Kheri: Lakhimpur Sadar MLA Yogesh Verma was meeting some people when an argument broke out following which he was shot at. He is out of danger. He is in a state of shock and unable to give a statement right now. Investigation underway. pic.twitter.com/xb0nDRrdFg
— ANI UP (@ANINewsUP) March 21, 2019