लोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व सांगत होते भाजप आमदार; त्यांच्या मुलांची संख्या विचारताच म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:48 PM2021-07-21T14:48:38+5:302021-07-21T14:48:55+5:30

भाजप आमदार सांगताहेत लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं महत्त्व; त्यांच्या अपत्यांबद्दल विचारताच भलतंच उत्तर

Bjp Mla Ramlallu Bais A Father Of Nine Children Support Population Control Bill In Madhya Pradesh | लोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व सांगत होते भाजप आमदार; त्यांच्या मुलांची संख्या विचारताच म्हणाले...

लोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व सांगत होते भाजप आमदार; त्यांच्या मुलांची संख्या विचारताच म्हणाले...

googlenewsNext

सिंगरौली: संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्यावरून चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे नेते या कायद्याचं समर्थन करत आहेत. सिंगरोली जिल्ह्याचे भाजप आमदार रामलल्लू वैश्य यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये वैश्य लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं महत्त्व सांगत आहेत. विशेष म्हणजे वैश्य यांना नऊ मुलं आहेत. याबद्दल विचारलं असता ही मुलं देवाच्या इच्छेनं झाल्याचं त्यांनी सांगितलं.

मला १९९० नंतर मूल झालं नाही. मी आता ७८ वर्षांचा आहे. देवाच्या इच्छेनं हे सगळं झाल्याचं आमदार रामलल्लू वैश्य यांनी सांगितलं. आज लोकसंख्या नियंत्रण कायदा आल्यास तो सर्वांना लागू होईल, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. रामलल्लू वैश्य सिंगरौली मतदारसंघातून तीनदा निवडून आले आहेत. 'तुम्ही केवळ हिंदूंवर कायद्याचा बडगा उगाराल आणि मुस्लिमांना मोकळीक द्याल तर लोकसंख्या वाढ थांबेल का? त्यांना थांबवलं असतं, तर आम्हीदेखील थांबलो असतो,' असं वैश्य म्हणाले.

लोक माझं विधान चुकीच्या अर्थानं घेतात, असंदेखील वैश्य यांनी सांगितलं. 'कायदा सर्वांसाठी समान असायला हवा असं मला वाटतं. मग व्यक्ती हिंदू असो मुस्लिम असो शीख असो किंवा मग ख्रिश्चन असो. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. तुम्हाला ९ मुलं आहेत. तुम्ही काय नियंत्रण ठेवलंत, असा प्रश्न लोक मला विचारतात. मला १९९० नंतर एकही मूल झालं नाही. या गोष्टीला आता ३० वर्ष उलटून गेली आहेत, असं उत्तर मी प्रश्न विचारणाऱ्यांना देतो,' असं वैश्य म्हणाले.

Web Title: Bjp Mla Ramlallu Bais A Father Of Nine Children Support Population Control Bill In Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा