मायावतींवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या भाजपाच्या महिला आमदाराचा माफीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 08:15 PM2019-01-20T20:15:26+5:302019-01-20T20:15:45+5:30
बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजपा आमदार साधना सिंह यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.
लखनौ : बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजपा आमदार साधना सिंह यांनी आपला माफीनामा सादर केला आहे. यामध्ये साधना सिंह यांनी असे म्हटले आहे की, मला कुणाला दुखवायचे नव्हते. मात्र, माझ्या भाषणातून कुणाला ठेच पोहोचली असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते, अशा शब्दांत साधना सिंह यांनी माफी मागितली आहे.
BJP MLA Sadhna Singh on her statement on BSP chief Mayawati: I had no intentions of disrespecting anyone, I express regret if someone was hurt by my words. pic.twitter.com/k4PRoaSpS4
— ANI UP (@ANINewsUP) January 20, 2019
चंदोलीमधील मुगलसराय मतदार संघातील आमदार असलेल्या साधना सिंह परनपुरा गावातील किसान कुंभ अभियान कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मायावतींवर टीका केली. त्या म्हणाल्या, ''जेव्हा द्रौपदीचे वस्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. मात्र सपाने मायावतींचे वस्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे.'' मात्र, साधना सिंह एवढ्यावरच थांबल्या नाहीत. मायावती या ना पुरुष दिसतात ना स्त्री, असे अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले.
#WATCH:BJP MLA Sadhna Singh says about BSP chief Mayawati, "jis din mahila ka blouse, petticoat, saari phat jaaye, wo mahila na satta ke liye aage aati hai. Usko pure desh ki mahila kalankit maanti hai.Wo to kinnar se bhi jyada badtar hai, kyunki wo to na nar hai, na mahila hai." pic.twitter.com/w3Cdizd8eR
— ANI UP (@ANINewsUP) January 19, 2019
दरम्यान, भाजपाच्या महिला आमदारांनी केलेल्या या टीकेविरोधात बसपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असा टोला हसपा नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी लगावला आहे. भाजपा नेत्यांनी मायावतींविरोधात ज्या भाषेचा वापर केला आहे. तो त्यांची पातळी दाखवतो. सपा-बसपा आघाडी झाल्यानंतर भाजपा नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असे मिश्रा म्हणाले.
SC Mishra(BSP) on Sadhna Singh's (BJP) remark on Mayawati: The words she used for our party chief shows the level of BJP. After the announcement of this coalition (SP-BSP), BJP leaders have lost their mental balance & they should be admitted to mental hospitals in Agra & Bareilly pic.twitter.com/py4L7c2z9c
— ANI UP (@ANINewsUP) January 19, 2019
तसेच, याप्रकरणी चंदोली येथील बबुरी पोलीस स्टेशनमध्ये बसपा नेता रामचंद्र गौतम यांनी साधना सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Chandauli: BSP's Ram Chandra Gautam has lodged a complaint in Baburi police station against BJP MLA Sadhna Singh over her statement on BSP chief Mayawati. pic.twitter.com/ahVatjGHuT
— ANI UP (@ANINewsUP) January 20, 2019