भाजपा आमदार म्हणतो राहुल गांधींना गोळ्या घाला
By admin | Published: February 18, 2016 01:18 PM2016-02-18T13:18:13+5:302016-02-18T13:18:50+5:30
राहुल गांधी देशद्रोही आहेत; त्यांना फासावर लटकवा आणि गोळ्या घाला' असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार कैलाश चौधरी यांनी केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
जयपूर, दि. 18 - 'जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांना समर्थन देणारे राहुल गांधी देशद्रोही आहेत; त्यांना फासावर लटकवा आणि गोळ्या घाला' असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार कैलाश चौधरी यांनी केलं आहे. 'राहुल गांधींनी माफी मागावी आणि काँग्रेस उपाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा' अशी मागणीही कैलाश चौधरी यांनी केली आहे.
आपल्या मतदारसंघात झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना कैलाश चौधऱी यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'काही लोक अफजल गुरुच्या समर्थनार्थ पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत तोडोच्या घोषणा देतात, आणि जर राहुल गांधी ज्यांना काँग्रेसच राजकुमार म्हणलं जातं ते जर या विद्यार्थ्यांची बाजू घेऊन त्यांना समर्थन देत असतील तर हा देशद्रोह आहे' असं कैलाश चौधरी यांनी म्हणलं आहे.
कैलाश चौधरी यांनी आपण असं वक्तव्य केल्याच म्हणलं आहे. मी देशभक्त आहे आणि जर कोणी आपल्या देशावर बोट उचलत असेल तर मी ते सहन करणार नाही म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. काँग्रेसने कैलाश चौधरी यांच्यावर कारवाई करत त्यांनी तात्काळ पक्षातून काढून टाकण्यात यावं अशी मागणी केली आहे.
कैलाश चौधरी यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
WATCH (17/02/16): Rajasthan BJP MLA Kailash Choudhary says Rahul Gandhi ko goli se shoot kar dena chahiyehttps://t.co/6LT0b5hkvj
— ANI (@ANI_news) February 18, 2016