विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! भाजपा आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:23 AM2021-03-13T08:23:14+5:302021-03-13T08:30:28+5:30

BJP MLA Subhash Chandra Panigrahi : भाजपाच्या एका आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे

BJP MLA Subhash Chandra Panigrahi tried to commit suicide in odisha legislative assembly | विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! भाजपा आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! भाजपा आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

Next

नवी दिल्ली - ओडिशा विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. भाजपाच्या एका आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभेत घडलेल्या या धक्कादायक घटनेने गोंधळ उडाला. सुभाष चंद्र पाणिग्रही (Subhash Chandra Panigrahi) असं या भाजपा आमदाराचं नाव असून ते देवगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. अन्न आणि पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत धान्य खरेदीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असतानाच हा हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

भाजपा आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही यांनी सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखलं. तसेच त्यांच्या हातातून सॅनिटायझर हिसकावून घेतलं. पाणिग्रही यांनी "सरकार टोकन सिस्टम आणि बाजार समित्यांमधील चुकीच्या व्यवस्थापनासारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरलंय. शेतकरी धान्य खरेदीबाबत कायमच चिंताग्रस्त राहिला आहे. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही" असा गंभीर आरोप केला आहे.

ओडिशात खळबळ! विधानसभेत असं कृत्य करण्यामागे "हे" आहे नेमकं कारण?

भाजपाच्या पाणिग्रही यांनी विधानसभेत सॅनिटायझर पिण्यामागचं नेमकं कारण देखील सांगितलं आहे. ओडिशा राज्य सरकारने आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवला नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत वारंवार उपस्थित करुनही सरकार शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच आपण सॅनिटायझर पिण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा आमदार पाणिग्रही यांनी केला आहे. 

आमदाराच्या या घटनेमुळे खळबळ उडाली. राज्य सरकारवर दबाब टाकण्यासाठी याआधीही सकाळी भाजपा आमदाराने सरकारला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात त्यांनी आंदोलनही केलं होतं. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचा धान्य खरेदी करा, अन्यथा आत्मदहन करेन अशी धमकी दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: BJP MLA Subhash Chandra Panigrahi tried to commit suicide in odisha legislative assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.