"ताजमहालचं नाव बदलून राम महल केलं जाईल"; भाजपा नेत्याचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:35 AM2021-03-15T08:35:59+5:302021-03-15T08:40:44+5:30
BJP MLA Surendra Singh And Taj Mahal : भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे लोकप्रिय आहेत. सिंह हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह (BJP MLA Surendra Singh ) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे लोकप्रिय आहेत. सुरेंद्र सिंह हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. ताजमहालचं (Taj Mahal) नाव बदलून ते राम महल (Ram Mahal) केलं जाणार आहे असा मोठा दावा त्यांनी आता केला आहे. शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. आग्रा येथील ताजमहाल हे शिवकालीन मंदिर होते आणि योगी प्रशासनात लवकरच त्याचे नाव राम महाल असं ठेवण्यात येईल असं सिंह यांनी म्हटलं आहे.
सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केलं आहे. "महाराजांचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत दाखल झाले आहेत. समर्थ रामदासस्वामींनी ज्याप्रमाणे भारताला छत्रपती शिवाजी महाराज दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिले आहे" असं म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यांनी पत्रकारांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. सिंह यांनी मुरादाबादमधील पत्रकारांवर झालेल्या कथित हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
"केवळ भारत आणि भारतीयतेचा गौरव करणारेच नेते होतील"
"पत्रकारांवर लाठी वापरणारे समाजवाद्यांचे खरे रूप समोर आले आहे. पण योगीजींच्या राजवटीत हे खपवून घेतले जाणार नाही. देशद्रोही मानसिकता असणार्या लोकांना कोणत्याही प्रकारची पसंती दिली जाणार नाही. केवळ भारत आणि भारतीयतेचा गौरव करणारेच नेते होतील" असं देखील भाजपा आमदाराने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. याच दरम्यान सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं होतं.
भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर केले आरोप https://t.co/ddJtUqyQTJ#WestBengalElection2021#WestBengalElections#MamataBanerjee#TMC#BJP#Police
— Lokmat (@MiLOKMAT) March 9, 2021
"मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान
सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. "आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.
Yashwant Sinha Joins TMC : अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश https://t.co/4T9qYaLhK8#YashwantSinha#TMC#BJP#WestBengalElection2021#WestBengal#Politics#MamataBanerjeepic.twitter.com/NfFNzKtL7Y
— Lokmat (@MiLOKMAT) March 13, 2021