'जो राम का नाम ना ले उसको...'; रामनवमीच्या मिरवणुकीत भाजप आमदारानं गायलं वादग्रस्त गाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 07:55 PM2022-04-11T19:55:33+5:302022-04-11T19:56:24+5:30
सीतारामबाग येथून निघालेल्या या मिरवणुकीचे नेतृत्व स्वतः राजा सिंह करत होते. मिरवणुकीपूर्वी त्यांनी राणी अवंतीबाई हॉलमध्ये प्रभू श्रीरामांची पूजा केली.
हैदराबाद - रामनवमीच्या मिरवणुकीत देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. पण हैदराबादमध्ये असे कुठलेही वृत्त नाही. मात्र, आता भाजपचे गोशामहल मतदारसंघातील आमदार टी राजा सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते एक वादग्रस्त अथवा चिथावणीखोर गाणे गाताना दिसत आहेत. खरे तर राजा सिंह हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या विषयावरून वादात असतात.
सीतारामबाग येथून निघालेल्या या मिरवणुकीचे नेतृत्व स्वतः राजा सिंह करत होते. मिरवणुकीपूर्वी त्यांनी राणी अवंतीबाई हॉलमध्ये प्रभू श्रीरामांची पूजा केली. या मिरवणुकीत हजारो लोक भगव्या टोप्या घालून सहभागी झाले होते. यावेळी राजा सिंह यांनी हिंदूंना संघटित होण्याचे आवाहनही केले.
BJP MLA Raja Singh sings the song "Jo ram ka naam na le unko bharat se bhagana Hai" at #RamNavami Rally in Hydrabad.@hydcitypolice should take immediate action on this.@asadowaisi@KTRTRSpic.twitter.com/wGEEa7FHEg
— Naved Sheikh (@navedns1) April 10, 2022
राजा सिंह यांनी गायलेल्या या गाण्यात, काशी आणि मथुरा येथेही भगवा झेंडा फडकवायचा असल्याचे म्हणण्यात आले आहे. याशिवाय, हिंदूंच्या शत्रूंना रडावे लागेल, अशा आशयाची ओळीही या गाण्यात होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हैदराबाद पोलिसांनी टी राजा यांना अटक करायला हवी, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.