Video : माझी ताकद तुम्हाला माहीत नाही का? भाजपा आमदाराची महिला अधिकाऱ्याला दमदाटी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 12:13 PM2018-12-18T12:13:56+5:302018-12-18T15:32:59+5:30
आग्रा जिल्ह्यातील फतेहपूर सीकरीमध्ये एका भाजपा आमदाराने महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
आग्रा - आग्रा जिल्ह्यातील फतेहपूर सीकरीमध्ये एका भाजपा आमदाराने महिला अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. उदयभान चौधरी असं या भाजपा आमदाराचं नाव असून चौधरी यांनी उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावलं आहे. ‘तुम्हाला माहिती नाही का मी आमदार आहे? तुम्हाला माझी ताकद कळली नाही का? लोकशाहीची ताकद कळली नाही का ?’ अशा शब्दात उदयभान चौधरी धमकावत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून अनेक गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी (17 डिसेंबर) किरावली येथील तहसील कार्यालयाला घेराव घातला होता. याच दरम्यान संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी भाजपाचे आमदार उदयभान चौधरी यांना घेरलं आणि घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी चौधरी यांनी उप-विभागीय दंडाधिकारी गरिमा सिंह यांना धमकावलं आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
#WATCH Agra: BJP MLA Udaybhan Chaudhary threatens SDM Garima Singh, says 'Don't you know I am an MLA? Don't you realize my power, the power of democracy?' He had gone to meet the SDM over farmer issues (17.12.18) pic.twitter.com/3lfTlXAi46
— ANI UP (@ANINewsUP) December 18, 2018
उदयभान चौधरी हे भाजपाचे फतेहपूर-सिकरीचे आमदार आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदयभान चौधरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे. मात्र त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करत माफी मागण्याची कोणतीही गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच उप-विभागीय दंडाधिकारी लोकांचं म्हणणं ऐकून घेत नसल्याचा आरोपही चौधरी यांनी केला आहे.
BJP Agra MLA Udaybhan Chaudhary: Farmers had gone to the SDM with their problems but the SDM was talking to them very rudely. I admit that I scolded her but it was just like I would scold a daughter. pic.twitter.com/1xF0QVrq0h
— ANI UP (@ANINewsUP) December 18, 2018