शक्तिमान घोड्यावर हल्ला करणा-या भाजपा आमदाराला न्यायालयीन कोठडी
By admin | Published: March 18, 2016 03:12 PM2016-03-18T15:12:33+5:302016-03-18T17:45:18+5:30
मसुरी येथे आंदोलना दरम्यान शक्तीमान घोडयाला अमानुष मारहाण करणा-या भाजपा आमदाराला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
डेहारडून, दि. १८ - मसुरी येथे आंदोलना दरम्यान शक्तीमान घोडयाला अमानुष मारहाण करणा-या भाजपा आमदाराला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भाजपा आमदार गणेश जोशीला डेहराडून येथे पोलिसांनी अटक केली होती.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी फंडाचा गैरवापर केल्याचा आरोप करत गणेश जोशीने समर्थकांसह आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी घोडयावरुन आलेल्या पोलिसांवर जोशी व त्याच्या समर्थकांनी हल्ला चढवला, त्याचवेळी जोशींनी शक्तीमान घोड्यावरही हल्ला केला होता. गणेश जोशीने केलेल्या हल्यात शक्तीमानच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे शक्तिमानला आपला पायदेखील गमवावा लागला.
गुरुवारी डॉक्टरांनी शक्तीमानच्या पायावर शस्त्रक्रिया करुन त्याला तात्पुरता कुत्रिम पाय बसवला आहे. गणेश जोशींच्या या अमानुष कृत्यावर लोकांसह सेलिब्रेटींनीदेखील रोष व्यक्त केला होता. शक्तीमान स्वत:च्या पायावर उभा राहू शकत असला तरी लवकरच त्याला कायमस्वरुपी कुत्रिम पाय बसवणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
BJP MLA Ganesh Joshi (arrested for allegedly attacking Police horse) in Police lockup in Dehradun pic.twitter.com/mY0iZnHJfC
— ANI (@ANI_news) March 18, 2016