'बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही, खाजगीकरण केल्यानंतर काढले जाईल', भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 05:17 PM2020-08-11T17:17:30+5:302020-08-11T17:29:38+5:30

भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

BJP MP anant kumar hegde says bsnl employees are traitors | 'बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही, खाजगीकरण केल्यानंतर काढले जाईल', भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान

'बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही, खाजगीकरण केल्यानंतर काढले जाईल', भाजपा खासदाराचे वादग्रस्त विधान

Next
ठळक मुद्देमहात्मा गांधीजींनी ज्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले, ते वास्तवात आंदोलन नव्हे, तर एक नाटक होते, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले होते.

नवी दिल्ली : भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आले आहेत. यावेळी बीएसएनएल कर्मचाऱ्यांबाबत त्यांनी विधान केले आहे. बीएसएनएलच्या ८८००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे, असे अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. १० ऑगस्ट रोजी उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमटा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अनंतकुमार हेगडे म्हणाले, "बीएसएनएलचे कर्मचारी देशद्रोही आहेत. जे प्रसिद्ध कंपनी विकसित करण्यासाठी काम करण्यास इच्छुक नाहीत. ८८००० हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले जाणार आहे. कारण सरकार बीएसएनएलचे खाजगीकरण करणार आहे. ''

दरम्यान, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल असे विधान केले होते, यावरुन बराच वाद झाला होता. महात्मा गांधीजींनी ज्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व केले, ते वास्तवात आंदोलन नव्हे, तर एक नाटक होते, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले होते.

याचबरोबर, अनंतकुमार हेगडे म्हणाले होते की, "या आंदोलनाचे नेतृत्त्व इंग्रजांच्या सहमतीने करण्यात आले. या कथित नेत्यांपैकी एकालाही पोलिसांनी मारले नाही. भारताला स्वातंत्र्य हे बलिदान आणि सत्याग्रहामुळे मिळाले हे काँग्रेसचे समर्थक सांगतात. पण हे सत्य नाही. इंग्रजांनी सत्याग्रहामुळे देश सोडला नव्हता."
 

Web Title: BJP MP anant kumar hegde says bsnl employees are traitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.