लैंगिक हेतूशिवाय महिलेला मिठी मारणे गुन्हा नाही; कोर्टात ब्रिजभूषण यांच्या वकिलाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 08:53 PM2023-08-09T20:53:24+5:302023-08-09T20:55:08+5:30

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान भाजपा खासदार मागील काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत.

 BJP MP Brijbhushan Sharan Singh's lawyer said while presenting his case before a court in Delhi that hugging a woman without sexual intent is not a crime | लैंगिक हेतूशिवाय महिलेला मिठी मारणे गुन्हा नाही; कोर्टात ब्रिजभूषण यांच्या वकिलाचे स्पष्टीकरण

लैंगिक हेतूशिवाय महिलेला मिठी मारणे गुन्हा नाही; कोर्टात ब्रिजभूषण यांच्या वकिलाचे स्पष्टीकरण

googlenewsNext

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान भाजपा खासदार मागील काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. महिला कुस्तीपटूंनी केलेले गंभीर आरोप अन् राजकारण्यांनी या वादात घेतलेली उडी सिंह यांच्या प्रसिद्धीचे कारण. पण, जवळपास दीड महिने दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. आता आखाड्याबाहेरील ही लढाई कोर्टात सुरू असून बुधवारी सिंह यांच्या वकिलाने आपली बाजू मांडताना आपला बचाव केला. लैंगिक हेतूशिवाय महिलेला मिठी मारणे हा गुन्हा नाही, असे ब्रीजभूषण यांच्या वकिलाने सांगितले. 

बुधवारी दिल्लीतील न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना सिंह यांचे वकील राजीव मोहन यांनी सांगितले की, हे आरोप जुने होते. जर याचिकाकर्ता निर्भयपणे फिरत असेल आणि पाच वर्षांपासून एकदाही पुढे आली नसेल आणि आता तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला धमकी देण्यात आली आहे, तर त्या तथ्य आहे असे वाटत नाही. हे गुन्हे भारताबाहेर केले आहेत त्यामुळे मंजुरीअभावी न्यायालयात खटला चालवता येत नाही. दोन गुन्हे अशोका रोड आणि सिरी किल्ल्याशी संबंधित आहेत. पण, लैंगिक हेतूशिवाय महिलेला स्पर्श करणे म्हणजे गुन्हा नाही.

कोर्टात  ब्रिजभूषण यांची साक्ष 
तसेच कुस्ती एक खेळ आहे, ज्यामध्ये अधिकाधिक प्रशिक्षक हे पुरूष असतात. महिला प्रशिक्षकांची संख्या फार कमी असते. एखाद्या खेळाडूच्या विजयाच्या आनंदात प्रशिक्षकाने एखाद्या खेळाडूला मिठी मारली, तर तो गुन्हा होत नाही. घटना घडतात आणि कुतूहलामुळे पुरुष प्रशिक्षकाने एखाद्या महिला खेळाडूला मिठी मारली तर तो गुन्हा ठरत नाही, असेही ब्रीजूषण यांच्या वकिलांनी नमूद केले. 

दरम्यान, गुरूवारी देखील या प्रकरणाची सुनावणी सुरू राहणार आहे. याआधी  २० जुलै रोजी मेट्रोपॉलिटन कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह यांना जामीन मंजूर केला होता. २५ हजार रुपयांचा बाँडही काढला होता. यासोबतच ते देश सोडून परदेशात जाऊ शकत नाहीत, अशी अटही न्यायालयाने घातली होती.

Web Title:  BJP MP Brijbhushan Sharan Singh's lawyer said while presenting his case before a court in Delhi that hugging a woman without sexual intent is not a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.