जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है; भाजपा खासदारांच्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 11:41 AM2018-03-06T11:41:32+5:302018-03-06T11:41:32+5:30
बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी खासदारांनी मोदींचे अभिनंदन केले. यावेळी मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.
नवी दिल्ली: ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदाच भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. यावेळी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मोदी बैठकीच्या ठिकाणी आल्यानंतर 'जीत हमारी जारी है, अब कर्नाटक की बारी है', अशा घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी खासदारांनी मोदींचे अभिनंदन केले. यावेळी मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना मिठाई भरवून त्यांचे तोंड गोड केले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी संसदेत विरोधकांकडून अनेक मुद्दयांवर सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, अनेक विधेयकं या अधिवेशनात मंजूरीसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत. या सगळ्याबाबत संसदीय मंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Bharatiya Janata Party (BJP) parliamentary party meeting underway in #Delhipic.twitter.com/h3gB594WDw
— ANI (@ANI) March 6, 2018