गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 05:43 PM2024-06-26T17:43:03+5:302024-06-26T17:44:21+5:30

चिराग आणि कंगना 13 वर्षांपूर्वी एका चित्रपटात दिसून आले होते. आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

bjp mp kangana ranaut and chirag paswan chemistry in parliament Watch the viral VIDEO | गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यापासूनच कंगना रनौत सातत्याने चर्चेत आहे. याशिवाय, लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास पासवान) अध्यक्ष चिराग पासवानही चर्चेत आहेत. चिराग आणि कंगना 13 वर्षांपूर्वी एका चित्रपटात दिसून आले होते. आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

कंगना-चिराग यांचा व्हिडिओ व्हायरल -
कंगना आणि चिराग पासवान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ संसद भवनातील आहे. चिराग पासवान यांनी बिहारमधील हाजीपूर येथून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. संसदेत पोहोचले असता कंगना आणि चिराग यांनी भेट झाली.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, कंगना आणि चिराग एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. यानंतर ते काही बोलत आहेत. यानंतर गंगना चिराग यांना टाळी देते आणि दोघेही हसतात. यानंतर दोघेही संसदेत जातात. सोशल मीडियावर या व्हिडिओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. अनेक नेटिझन्स तर या दोघांच्या भेटीचा रोमँटिक अँगलही काढत आहेत.

कंगना-चिराग यांनी या चित्रपटात केलं आहे काम -
चिराग पासवान यांनी आपल्या डेब्यू फिल्ममध्ये कंगना रनौतसोबत काम केले आहे. 13 वर्षांपूर्वी दोघांचा चित्रपट आला होता. 'मिले ना मिले हम' असे चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात कंगना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवू शकला नव्हता.

Web Title: bjp mp kangana ranaut and chirag paswan chemistry in parliament Watch the viral VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.