Video : '...तर ते तुमच्या घरात घुसतील, बहीण-मुलीवर बलात्कार करतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 11:59 AM2020-01-28T11:59:21+5:302020-01-28T12:13:22+5:30
भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
नवी दिल्ली - दिल्लीतील शाहीनबाग येथे सीएएविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपाच्या आणखी एका नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. 'शाहीनबाग हे काश्मीर झालं आहे. भाजपा सत्तेत आली नाही तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुलीला-बहिणीला उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील आणि मारून टाकतील' असं वादग्रस्त विधान भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी केलं आहे. तसेच दिल्लीत भाजपा सत्तेत आली तर शाहीनबाग एका तासात रिकामा करू असं देखील वर्मा यांनी म्हटलं आहे.
भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी 'दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आम्ही शाहीनबागसोबत आहोत असं म्हणतात. मात्र शाहीनबाग हे काश्मीर झाले आहे. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे काश्मीर पंडितांच्या बहिणीवर, मुलीवर अत्याचार झाले. त्याचप्रमाणे दिल्लीत परिस्थिती उद्भवेल. भाजपा सत्तेत आली नाही तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुलीला-बहिणीला उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील आणि मारतील. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. उद्या मोदी किंवा अमित शहा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत' असं म्हटलं आहे.
#WATCH: BJP MP Parvesh Verma says, "...Lakhs of people gather there (Shaheen Bagh). People of Delhi will have to think & take a decision. They'll enter your houses, rape your sisters&daughters, kill them. There's time today, Modi ji & Amit Shah won't come to save you tomorrow..." pic.twitter.com/1G801z5ZbM
— ANI (@ANI) January 28, 2020
'दिल्लीत जर भाजपा सत्तेत आली तर शाहीनबाग एका तासात रिकामा करू' असं देखील वर्मा यांनी म्हटलं आहे. कोण पाठिंबा देत आहे व कोण विरोध करीत आहे, हे सर्वांना माहिती आहे. जर दिल्लीत भाजपा सत्तेत आली तर आम्ही एका तासात शाहीन बाग रिकामा करू असं म्हणत शाहीनबागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे. भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी शाहीनबाग येथील आंदोलनातील लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी असल्याचं म्हटलं आहे. 'दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलनासाठी बसलेले बहुतांश लोक हे बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आले आहेत' असं वादग्रस्त विधान सिन्हा यांनी केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.
Will clear Shaheen Bagh within one hour if BJP forms govt in Delhi, says Parvesh Verma
— ANI Digital (@ani_digital) January 28, 2020
Read @ANI Story | https://t.co/UhLgMxRQlFpic.twitter.com/X3hjqU66Ke
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. शाहीनबाग येथे सुरू असलेले आंदोलन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. या कायद्यावरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला हा डाव आहे. त्यामुळे शाहीनबाग हा देशाला तोडणारा मंच आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. सोमवारी (27 जानेवारी) एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
CAA : 'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'https://t.co/DPTaQihsLP#CAA
— Lokmat (@MiLOKMAT) January 28, 2020
प्रसाद यांनी तुकडे तुकडे गँगच्या मदतीने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात शाहीनबागमध्ये लहान मुलांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच शाहीनबागमधील लोकांना त्रास होत असताना केजरीवाल शांत कसे बसतात असा सवालही त्यांनी केला आहे. 'राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही सीएएबाबत संभ्रम निर्माण करत आहे. या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही हे आम्ही वारंवार सांगितले आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती ही सन्मानाने जगत होती आणि भविष्यातही प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार कायम राहणार आहे. कायद्यातील ज्या कलमावर आक्षेप आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. मात्र कोणीही चर्चा करण्यासाठी पुढे येत नाही' असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
'शाहीनबाग म्हणजे देश तोडणारा मंच', रविशंकर प्रसाद यांची टीकाhttps://t.co/zwlrfVAC64#CAA
— Lokmat (@MiLOKMAT) January 28, 2020
महत्त्वाच्या बातम्या
'दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीसोबत मुख्यमंत्र्यांची भेट; मग ऊत येणे स्वाभाविकच नाही का?'
Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त
...तर केंद्राकडून राज्य सरकार बरखास्त होईल?; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा इशारा
China Coronavirus : चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 106 जणांनी गमावला जीव
कोरोनाचे विषाणू १३ देशांमध्ये; राज्यात चार संशयित रुग्ण; देशात तिघे