भाजपा खासदारांच्या 6 वर्षांच्या नातीचा फटाक्याने भाजल्यामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 12:26 PM2020-11-17T12:26:22+5:302020-11-17T12:49:05+5:30
BJP Rita Bahuguna : चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फटाके पेटवताना त्यांची नात गंभीर जखमी झाली होती. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. भाजल्यानंतर तिला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळीच तिला उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला आहे.
रीता बहुगुणा जोशी या भाजपाच्या खासदार आहेत. त्यांचा मुलगा मयंक जोशी यांची सहा वर्षांची मुलगी दिवाळीत फटाके फोडत होती. फटाके पेटवताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. आणि ती गंभीररित्या भाजली. उपचारांसाठी तिला लागलीच स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी चिमुकलीचं शरीर 60 टक्के भाजल्याचं सांगितलं. तसेच तिला उपचारांसाठी दिल्लीला हलवण्याचा सल्ला दिला.
जोशी यांच्या नातीला मंगळवारी सकाळीच एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. फटक्यांमुळे होणारं प्रदूषण आणि कोरोनाच्या संकटात रुग्णांना त्यामुळे असणारा धोका लक्षात घेऊन अनेक राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी फटाक्यांची विक्री होत आहे. बुलंदशहरच्या खुर्जामध्ये फटाक्यांची विक्री करणाऱ्या एक दुकानावर पोलिसांना छापा मारला. दुकान विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या विक्रेत्याच्या मुलीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
ती रडत होती... जोरजोराने पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटत होती; जाणून घ्या नेमकं झालं काय?https://t.co/bD93CzNxiw#Police
— Lokmat (@MiLOKMAT) November 14, 2020
माझ्या वडिलांना सोडा म्हणत चिमुकलीने पोलिसांच्या गाडीवर आपटलं डोकं, Video व्हायरल
पोलिसांनी वडिलांना ताब्यात घेतल्यावर चिमुकलीने त्यांना सोडवण्यासाठी पोलिसांच्या गाडीवर डोकं आपटल्याची घटना समोर आली आहे. माझ्या वडिलांना सोडा असं म्हणत ती मदतीसाठी याचना करत होती. पोलिसांनी चिमुकलीला पाहिलं. मात्र त्यांनी आपली कारवाई सुरूच ठेवली. हे पाहून चिमुकलीने पोलिसांच्या गाडीवर जोरजोरात डोकं आपटून घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या चिमुकलीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ती थांबली नाही. चिमुकलीचा गाडीवर डोकं आपटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Delhi Pollution : दिल्ली-NCR मध्ये श्वास घेणंही झालं धोकादायक, नियम धाब्यावर बसवून लोकांनी फोडले फटाके https://t.co/hwwjfr1kNM#DelhiPollution#Delhi#DelhiAirQuality#Firecrackers
— Lokmat (@MiLOKMAT) November 15, 2020