"कमळाला मत द्या... नाहीतर लक्ष्मीजी नाराज होतील"; भाजपा खासदार सत्यपाल सिंह यांचं अनोखं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:03 PM2023-06-16T12:03:42+5:302023-06-16T12:04:53+5:30

जे कमळा सोबत नाहीत त्यांच्यावर लक्ष्मीचा राग नाराज होईल असंही खासदार म्हणाले. 

bjp mp satyapal singh appeals to vote for lotus to bring lakshmi in house baghpat | "कमळाला मत द्या... नाहीतर लक्ष्मीजी नाराज होतील"; भाजपा खासदार सत्यपाल सिंह यांचं अनोखं आवाहन

"कमळाला मत द्या... नाहीतर लक्ष्मीजी नाराज होतील"; भाजपा खासदार सत्यपाल सिंह यांचं अनोखं आवाहन

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील बागपतचे भाजपा खासदार सत्यपाल सिंह यांनी "कमळाला मत द्या, नाहीतर लक्ष्मी देवी नाराज होतील" असं केलं आहे. मंचावरून बोलताना खासदार म्हणाले की, लक्ष्मीचे आसन हे कमळ आहे, असं शास्त्रात लिहिलं आहे. ज्यांना घरात लक्ष्मी हवी आहे, त्यांना कमळ ठेवावे लागेल, कमळाला मतदान करावं लागेल आणि कमळाचं बटण दाबावे लागेल. जे कमळा सोबत नाहीत त्यांच्यावर लक्ष्मीचा राग नाराज होईल असंही खासदार म्हणाले. 

"लक्ष्मीला ना गाडी पाहिजे ना कार किंवा ना सायकल पाहिजे. लक्ष्मीला हवं फक्त कमळ" असं म्हटलं आहे. बागपतचे खासदार लाभार्थी परिषदेला संबोधित करण्यासाठी बरौत येथे आले होते, जिथे त्यांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केले. यापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी मुस्लिम मुलांना शाकाहारी जेवण खाण्याचा सल्ला दिला होता. घरातील एका मुलाला मांसाहार द्या आणि दुसऱ्याला शुद्ध शाकाहारी जेवण द्या, असे ते म्हणाले होते. 

मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यातील फरक पाहा. मुलाला शुद्ध शाकाहारी की मांसाहारी आहार द्यायचा हे तुम्हीच ठरवाल असंही म्हटलं होतं विशेष म्हणजे सत्यपाल सिंह हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिले आहेत. ते बागपत मतदारसंघातून दोन वेळा खासदार आहेत. 2014 मध्ये ते पहिल्यांदा विजयी झाले, त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन लोकसभेत पोहोचले. 2024 च्या निवडणुका पाहता सत्यपाल सिंह अशी विधानं करून चर्चेत राहत असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bjp mp satyapal singh appeals to vote for lotus to bring lakshmi in house baghpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.