भाजप खासदाराने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला? काँग्रेस, तृणमूल आणि MIMचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 08:27 PM2023-01-17T20:27:30+5:302023-01-17T20:27:37+5:30

10 डिसेंबर 2022 रोजी प्रवाशाने इंडिगो फ्लाइटचा आपात्कालीन दरवाजा उघडला. हा प्रवासी भाजप खासदार तेजस्वी सूर्या असल्याचा आरोप आहे.

BJP MP tejaswi Surya opens emergency door of plane? Allegation by Congress, Trinamool and MIM | भाजप खासदाराने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला? काँग्रेस, तृणमूल आणि MIMचा आरोप

भाजप खासदाराने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला? काँग्रेस, तृणमूल आणि MIMचा आरोप

googlenewsNext

Indigo Flight : गेल्या काही दिवसांपासून विमानात घडलेल्या घटना चर्चेत आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये घडली होती. एका प्रवाशाने चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजाच उघडला. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. हे विमान चेन्नईहून तिरुचिरापल्लीला जात होतं. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या प्रकरणात तेजस्वी सूर्याचे नाव
प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमानाला दोन तास उशीर झाला. पण, इंडिगो 6E-7339 फ्लाइटनं तपासणीनंतर लगेचच उड्डाण केलं. त्यावेळेस विमान कंपनीनं प्रवाशाची माफी स्वीकारली, पण कोणतीही कारवाई केली नाही. डीजीसीएने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले, पण त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली. दरम्यान, डिसेंबर महिन्यात घडलेल्या या घटनेत भाजयुमो अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्याचे नाव आले आहे. या विमानाचा दरवाजा तेजस्वी सूर्याने उघडल्याचा आरोप काँग्रेस, AIMIM आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे.

TMC, MIM, काँग्रेसचा आरोप

या घटनेवर काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, भाजपचे व्हीआयपी. एअरलाइनकडे तक्रार करायची हिम्मत कशी झाली. सत्ताधाऱ्यांची ही वृत्ती झाली आहे का? प्रवाशांच्या सुरक्षेसोबत तडजोड करतात का? तुम्ही भाजपच्या व्हीआयपींना प्रश्न विचारू शकत नाही.'

या घटनेवर प्रतिक्रिया देताना टीएमसीने म्हटले की, 'भाजप खासदार तेजस्वी सूर्याच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांचा जीव गेला असता. प्रत्यक्षदर्शी सांगतात की, त्यानेच 10 डिसेंबर 2022 रोजी इंडिगो फ्लाइटचा आपत्कालीन एक्झिट दरवाजा उघडला होता. डीजीसीए कोणतीही कारवाई करत नाही. त्यांच्या पक्षाने त्यांना मोफत पास दिला आहे का?'

एआयएमआयएमचे खासदार ओवेसी यांनी या घटनेवर प्रसारमाध्यमांच्या वृत्ताला टोला लगावत तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट केले की, 'तुमचे नाव "सुसंस्कृत" असेल तर ते कॅज्युअल आहे, जर नाव अब्दुल असेल तर.... कृपया सीटबेल्ट बांधा.'

सुरक्षेशी तडजोड नाही – DGCA
या घटनेची माहिती देताना डीजीसीएचे महासंचालक म्हणाले की, तामिळनाडूचे भाजप प्रमुख अन्नामलाई, डीएमकेचे प्रवक्ते बीटी अर्साकुमार आणि भाजप खासदार तेजस्वी सूर्या विमानात असल्याचे समोर आले आहे. द्रमुकच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की, अन्नामलाई आणि सूर्या फ्लाइटमध्ये उपस्थित होते. या घटनेनंतर त्यांना खाली उतरण्यास सांगण्यात आले आणि 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसमध्ये थांबवले. यादरम्यान, आम्ही सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली नाही. 
 

Web Title: BJP MP tejaswi Surya opens emergency door of plane? Allegation by Congress, Trinamool and MIM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.