"60 लाख पदे रिक्त, कुठे गेले बजेट?", वरुण गांधींचा पुन्हा आपल्याच सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:47 PM2022-05-28T12:47:20+5:302022-05-28T12:48:12+5:30

Varun Gandhi : आधीच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत, आता भाजप खासदारानेही आपल्याच सरकारला बेरोजगारीचा प्रश्न विचारला आहे.

bjp mp varun gandhi lashed on modi govt asked 60 lakh posts vacant where did budget go | "60 लाख पदे रिक्त, कुठे गेले बजेट?", वरुण गांधींचा पुन्हा आपल्याच सरकारवर हल्लाबोल

"60 लाख पदे रिक्त, कुठे गेले बजेट?", वरुण गांधींचा पुन्हा आपल्याच सरकारवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पिलीभीतचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी वरुण गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून (Unemployment Issue)आपल्या सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशात महागाईनंतर बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. यावरून वरुण गांधी यांनी आपल्याच सरकारला गोत्यात आणले आहे. आधीच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत, आता भाजप खासदारानेही आपल्याच सरकारला बेरोजगारीचा प्रश्न विचारला आहे.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विट करून केंद्रातील लष्कर, पोलीस, आरोग्य इत्यादींसह विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांची संख्या सांगितली आहे. ते म्हणाले, "बेरोजगारी 3 दशकांच्या सर्वोच्च पातळीवर असताना, ही आकडेवारी धक्कादायक आहे. नोकरभरतीअभावी कोट्यवधी तरुण निराश  आहेत. दुसरीकडे सरकारी आकडेवारीच्या म्हणण्यानुसार, देशात 60 लाख 'स्वीकृत पदे' रिक्त आहेत. या पदांसाठी तरतूद करण्यात आलेले बजेट गेले कुठे?, हे जाणून घेणे प्रत्येक तरुणाचा हक्क आहे!"

दरम्यान, भाजप खासदार वरुण गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भले ते त्यांच्याच पक्षाचे सरकार असो. देशातील मंजूर सरकारी पदांवर भरती न करण्याच्या केंद्रातील भाजप सरकारच्या हेतूवर त्यांनी यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशात रिक्त असलेल्या सरकारी पदांबाबत वरुण गांधी यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशातील बेरोजगारी 3 दशकांच्या सर्वोच्च पातळीवर असताना ही आकडेवारी धक्कादायक आहे, असे वरुण गांधी म्हणाले. तसेच, वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे देशातील विविध सरकारी विभागांमधील मंजूर रिक्त पदांची आकडेवारी शेअर केली आहे. त्यानुसार देशातील विविध सरकारी विभागांमध्ये 60 लाखांहून अधिक मंजूर पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये केंद्र सरकारच्या विविध विभाग, आरोग्य सेवा, शिक्षण विभाग, लष्कर, पोलीस, न्यायालयांमध्ये हजारो मंजूर पदे रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Web Title: bjp mp varun gandhi lashed on modi govt asked 60 lakh posts vacant where did budget go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.