Manish Sisodia: “मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:08 PM2023-03-05T15:08:33+5:302023-03-05T15:09:23+5:30

Manish Sisodia: अण्णा हजारेंच्या शिष्याने संपूर्ण दिल्ली मद्यमय केली, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

bjp national president j p nadda answer on will all cases be closed if aap manish sisodia joins bjp | Manish Sisodia: “मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?”

Manish Sisodia: “मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?”

googlenewsNext

Manish Sisodia: उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय कोठडी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने देशभरातील विविध राज्यांमध्ये जोरदार निदर्शने करत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही भाजपवर निशाणा साधला. यातच मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आला. 

मनीष सिसोदिया यांच्या अटकेबाबत आम आदमी पक्ष भाजप सरकारला अनेक प्रश्न विचारत आहे. विरोधी पक्षात राहिल्याने भाजप केजरीवाल सरकारला त्रास देत असल्याचे आपचे म्हणणे आहे. या सर्व विषयांवर जेपी नड्डा एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सविस्तर उत्तरे दिली. मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का, असा प्रश्न विचारण्यात आला. 

मनीष सिसोदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर सगळ्या केसेस बंद होतील का?

या प्रश्नाला उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, हे काहीही शक्य नाही. अशा लोकांना आम्ही आमच्या पक्षात का घ्यायचे? ही बाब शक्य नाही. शिक्षणाच्या नावाखाली संपूर्ण दिल्ली मद्याच्या नशेत बुडवली. आयुष्यभर मद्याच्या विरोधात असणाऱ्या अण्णा हजारेंच्या शिष्याने संपूर्ण दिल्ली मद्यमय केली. अशा लोकांना घेऊन भाजप पुढे जाऊ शकत नाही, असे जेपी नड्डा यांनी सांगितले. 

दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काहीही सापडले नाही. मनीष सिसोदिया यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप भाजपचे लोक करतात. तसे असते तर त्यांच्या घरात थोडे तरी पैसे सापडले असते. रंगेहात भाजप नेत्याच्या मुलाला पकडले, पण मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. हा मोठा अन्याय आहे, असे सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp national president j p nadda answer on will all cases be closed if aap manish sisodia joins bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.