“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:52 PM2021-03-30T14:52:15+5:302021-03-30T14:53:51+5:30
राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली असून, याचा संबंध थेट सचिन वाझे प्रकरणाशी जोडला जात आहे.
नवी दिल्ली:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना अचानक पित्ताशयाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे, यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली असून, याचा संबंध थेट सचिन वाझे प्रकरणाशी जोडला जात आहे. सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) असे काय सांगितले की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले, अशी टीका केली जात आहे. (bjp naveen kumar jindal give reaction on sharad pawar admitted in hospital)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात NIA ने सचिन वाझे यांना अटक केली आहे. NIA कडून कसून तपास केला जात असून, अटक झाल्यापासून सचिन वाझे दररोज नवनवीन खुलासे करत आहे. या प्रकरणाचा आणि शरद पवार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा संबंध दिल्लीतील भाजपचे मीडिया प्रमुख नवीन जिंदल यांनी जोडला. यावरून त्यांनी टीका केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप २९४ पैकी ३०० जागा जिंकेल; यशवंत सिन्हांची खोचक टीका
बंगालपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर होईल
शरद पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असे वाटू लागले आहे, असा दावा करत सचिन वाझेंनी एनआयएसमोर असा कोणता खुलासा केला की, शरद पवार यांच्या अचानक पोटात दुखायला लागले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले. दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है, असे वाटायला लागले आहे, असे ट्विट जिंदल यांनी केले आहे.
सचिन वाजे ने NIA के सामने अब ऐसा क्या खुलासा कर दिया की शरद पवार अचनाक को इतना तेज पेट दर्द हुआ की उन्हें हॉस्पिटल में भर्ती होना पड़ा है अब तो ऐसा लग रहा है की दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है। #महाराष्ट्र_सरकार
— Naveen Kumar (@naveenjindalbjp) March 29, 2021
“POK वर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र्य करणे, हे आता विसरून जा”
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीचे वृत्त समजताच अनेक दिग्गजांनी विचारपूस करत त्यांच्यासाठी प्रार्थना केली. लता मंगेशकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा यामध्ये समावेश होता. शरद पवार यांनीही सर्वांनी दिलेल्या सदिच्छा आणि केलेल्या प्रार्थनेबाबत आभार मानले आहेत. शरद पवार यांचे पश्चिम बंगाल आणि केरळमधील प्रचार दौरे नियोजित होते. मात्र, आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.