वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 04:31 PM2023-02-17T16:31:12+5:302023-02-17T16:31:20+5:30

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या बैठकीत सर्व खासदार आणि नेत्यांना सूचना दिल्या आहेत.

BJP News, Avoid statements on controversial and religious topics; Order of party leaders to BJP leaders | वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश

वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये टाळावीत; भाजप नेत्यांना पक्षश्रेष्टींचा आदेश

googlenewsNext


नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय नेते अनेक वादग्रस्त विषयांवर विधाने करताना आपण ऐकले असतील. यात भाजपच्या नेत्यांचाही समवेश आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज आहेत. यातच आता भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून वादग्रस्त आणि धार्मिक विषयांवर वक्तव्ये न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. खासदारांनी धार्मिक गोष्टी, सनातन धर्म आदी विषयांवर विधाने करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी अर्थसंकल्प आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत सर्व खासदारांसोबत ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत जेपी नड्डा यांनी खासदारांना कडक सूचना दिल्या आहेत. काही मुद्द्यांवर खासदारांना विधाने करण्यापासून परावृत्त करावे लागेल, असे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यावेळी सांगितले. 

पक्षात एक यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेनुसार पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच अशा विषयांवर विधाने करतात. धार्मिक बाबी, सनातन धर्म यासारख्या विषयांवर लक्ष दिले जाईल. राजकीय लोकांनी यात पडू नये, अनावश्यक विधाने करू नयेत.  नेत्यांची बागेश्वर धामवर श्रद्धा आहे त्यांनी तिथे जावे पण अनावश्यक वक्तव्ये टाळावीत, असे नड्डा यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: BJP News, Avoid statements on controversial and religious topics; Order of party leaders to BJP leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.