Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबान लक्ष्य करणार नाही, कारण PM मोदीजी…”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:29 PM2021-08-17T13:29:02+5:302021-08-17T13:29:54+5:30

या घडामोडीच्या बाबतीत सोशल मीडियावरही उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

bjp nighat abbas tweet goes viral on afghanistan taliban crisis | Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबान लक्ष्य करणार नाही, कारण PM मोदीजी…”

Afghanistan Taliban Crisis: “अफगाणिस्तानमधील भारतीयांना तालिबान लक्ष्य करणार नाही, कारण PM मोदीजी…”

Next

नवी दिल्ली:तालिबाननेअफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवला असून, आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने एकेक करून अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा मिळवला. या धुमश्चक्रीवेळी जागतिक स्तरावरून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र अगदी गल्लीपासून अमेरिकेपर्यंत अनेकविध देश आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या घडामोडीच्या बाबतीत सोशल मीडियावरही उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजपच्या एका महिला नेत्याने केलेले ट्विट व्हायरल होत आहे. (bjp nighat abbas tweet goes viral on afghanistan taliban crisis) 

“मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी...”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा

तालिबानने अफगाणिस्तावर ताबा घेतल्यानंतर भारतातही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी तर मोदी सरकावर टीकास्त्र सोडले असून, भाजप समर्थक पंतप्रधान मोदींचे गोडवे गाताना दिसत आहे. यातच दिल्ली भाजपाच्या प्रवक्त्या निघट अब्बास यांनी केलेले हे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. 

तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

तालिबान भारतीयांना लक्ष्य करणार नाहीत!

तालिबानने म्हटले आहे की, ते अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाहीत. म्हणजे त्यांना पण ठाऊक आहे की मोदींजी त्यांना तीतर बनवू शकतात, असे निघट अब्बास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधील तीतर हा शब्द कोंबडा या अर्थाने वापरण्यात आला असून, तालिबानने भारतीयांवर नजर टाकली तर मोदी त्यांची अवस्था एखाद्या लाचार पक्षाप्रमाणे करुन टाकतील असे संकेत ट्विटमधून दिलेत, असे सांगितले जात आहे. 

मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी

सन २०१३ मध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत केलेल्या एका भाषणादरम्यान भारताने तालिबानशी संवाद कायम ठेवायला हवा. या चर्चेच्या माध्यमातून राजकीय हितांचे संरक्षण करायला हवे, असे म्हटले आहे. मी तेव्हाच सांगितले होते की, अफगाणिस्तानातील आपल्या हितांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तालिबानशी राजकीय स्तरावर संवाद सुरू केला पाहिजे. भारताने अफगाणिस्तानात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. कोणत्याही सरकारने या बाजूकडे लक्ष दिलेले नाही. आता यावर भारत सरकार काय करणार, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे. अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका काय हे अद्यापही स्पष्ट नाही, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

दरम्यान, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून तालिबानने काबूलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबूलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले.  त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दूतावास रिकामे करण्यात आले असून तेथील नागरिक आणि कर्मचाऱ्यांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबूल विमानतळावर विमाने पाठवली आहेत. 

Web Title: bjp nighat abbas tweet goes viral on afghanistan taliban crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.