गाईच्या जाहिरातीवरुन भाजपाचा नितीशकुमारांवर नेम
By admin | Published: November 4, 2015 12:13 PM2015-11-04T12:13:37+5:302015-11-04T12:13:56+5:30
बिहारमधील पाचव्या टप्प्यातील मतदानाला एक दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच भाजपाने गाईची जाहिरात देत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ४ - बिहारच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बीफवरुन राजकारण सुरु झाले आहे. बिहारमधील पाचव्या टप्प्यातील मतदानाला एक दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच भाजपाने गाईची जाहिरात देत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
बुधवारी बिहारमधील अनेक वृत्तपत्रांमध्ये भाजपाची गाईची जाहिरात छापण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये एक महिला गाईला कुरवाळताना दाखवण्यात आली आहे. त्याखाली नितीश कुमार टीकाही करण्यात आली आहे. 'मुख्यमंत्रीजी, तुमचे मित्रपक्ष वारंवार गाईचा अपमान करत असताना तुम्ही शांत होता' असे जाहिरातीमध्ये म्हटले आहे. मताचे राजकारण बंद करुन तुम्ही मित्रपक्षाच्या विधानांशी सहमत आहात का हे स्पष्ट करावे असे आव्हानच नितीशकुमारांना देण्यात आले आहे. 'उत्तर नाही तर मत नाही' असेही या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. भाजपाच्या या जाहिरातीवरुन विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले असून याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारीही विरोधकांनी सुरु केेली आहे.