"भाजपा फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा चालवत नाहीत!"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 06:42 PM2019-01-01T18:42:44+5:302019-01-01T18:43:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. बऱ्याचदा भाजपा हा पक्ष सध्या मोदी आणि शहाच चालवत असल्याचं बोललं जातं. विरोधकांसह अनेक राजकीय नेत्यांमध्ये मोदी आणि शाह यांच्या पक्षातल्या एकाधिकारशाहीवर खासगीत चर्चा होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर खुलासा केला आहे.
भाजपाला नरेंद्र मोदी आणि अमित शाह चालवत असल्याचं सांगितलं जातं. परंतु असं जे लोक म्हणतात ते भाजपा हा पक्षाला ओळखत नाहीत. भाजपा आज जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपा हा दोन व्यक्ती नव्हे, तर पोलिंग बूथवर चालत असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. तसेच मोदी लाटेवरही ते म्हणाले, विरोधकांनाही मोदी लाट आहे हे मान्य आहे.
हीच खूप मोठी गोष्ट आहे. परंतु लाट ही जनतेच्या आशा आणि आकांक्षाची असते, असंही मोदी म्हणाले आहेत. तसेच काँग्रेस एक विचार, एक संस्कृती आहे. ही संस्कृती देशात पसरली आहे. त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमुक्त भारत असं म्हणतो तेव्हा त्या संस्कृतीतून देशाला मुक्त करण्याचं मी सांगत असतो. देशात ताकदवान विरोधी पक्ष नाही हे देशाचं दुर्दैव आहे.
#PMtoANI: Even Congress people say Congress is a thought, a culture. When I say Congress-mukt, I want to rid the country from this culture and this sort of thinking. And I say that Congress too needs to be mukt of this Congress culture. pic.twitter.com/BXoELcK36H
— ANI (@ANI) January 1, 2019
#PMtoANI: It is a fact that those considered first family, who ran the country for four generations, are out on bail,that too for financial irregularities. It is a big thing.A set of people,who are at their service,are trying to suppress such information and push other narratives pic.twitter.com/gXpPdHWmso
— ANI (@ANI) January 1, 2019