Pankaja Munde: “सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ यावे, महागाई नसावी हेच PM मोदींचे ध्येय”: पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:43 PM2021-10-19T12:43:07+5:302021-10-19T12:44:28+5:30

Pankaja Munde: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या होत्या.

bjp pankaja munde reaction on fuel price hike and said pm modi had goal for no inflation | Pankaja Munde: “सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ यावे, महागाई नसावी हेच PM मोदींचे ध्येय”: पंकजा मुंडे

Pankaja Munde: “सामान्य माणसाला ‘अच्छे दिन’ यावे, महागाई नसावी हेच PM मोदींचे ध्येय”: पंकजा मुंडे

Next

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनदरात (Fuel Price Hike) वाढ केली जात आहे. याशिवाय घरगुती गॅसच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून, महागाईमुळे (Inflation) खिशाला दिवसेंदिवस मोठी कात्री लागताना दिसत आहे. काँग्रेसने तर देशभरात महागाईविरोधात आंदोलने केली आहेत. यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत महागाई नसावी, हेच पंतप्रधान मोदींचे ध्येय असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या होत्या. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले. अंत्योदयचा संस्कार पक्षात असल्याने या बैठकीत चर्चा झाली. अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.  

महागाई नसली पाहिजे

राष्ट्रीय सचिव म्हणून मला असे वाटते की, या महागाईवर तोडगा निघायला हवा. महागाई नसली पाहिजे. सामान्य माणसांना चांगले दिवस आले पाहिजेत, असेच पंतप्रधानांचे ध्येय आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल, असा विश्वास पंकडा मुंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच निवडणुका लढण्यामागे भाजपचा एक हातखंडा आहे. मध्य प्रदेशची प्रभारी असल्याने तिथे प्रचाराला जाणार आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्रातील ओबीसींमध्ये तीव्र संताप 

महाराष्ट्रात ओबीसींना मिळालेले आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा वर जात होते. ५० टक्क्यांवरील आरक्षण रद्द होईल, अशी अपेक्षा असताना आरक्षण रद्द झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण दिले होते ते सुद्धा रद्द झाले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. विधानसभेच्या पातळीवर काही बदल करता येतात ते करायला हवे, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. 

दुष्काळामुळे कारखान्यांना प्रचंड फटका 

राज्यामध्ये सहकार अडचणीत आहे. दुष्काळामुळे कारखान्यांना प्रचंड फटका बसत आहे. शेतकऱ्यांसाठी उस गाळप करत असताना शेतीवरील आधारीत उद्योगांना वेगळी वागणूक न देता उसाचे भाव वाढवले जातात, तशाच प्रकारे साखरेच्या, इथेनॉलच्याही भावाबाबत निर्णय घ्यायला हवा. जे कारखाने नुकसान सहन करत आहेत त्यांच्याबाबतीत भूमिका घेऊन कारखाना चालू राहायला हवा, असे सांगत काही लोकांना अशा पद्धतीने साखर उद्योगाला हाताळले आहे की, त्यात नकारात्मता झाली असेल. अनेक उद्योग अडचणीत आल्यानंतर देशातील उद्योगपती ते उद्योग हातात घेतात. त्यामुळे साखर उद्योगाकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. साखर उद्योगाचे व्याज माफ केले पाहिजे. सरकारने कर्जाची हमी घ्यायला हवी. यासाठी सरकारने पॅकेज द्यायला हवे, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना केली. 
 

Web Title: bjp pankaja munde reaction on fuel price hike and said pm modi had goal for no inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.