भाजप संसदीय पक्षाची आज दिल्लीत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 01:58 AM2019-11-19T01:58:10+5:302019-11-19T01:58:29+5:30
भाजपच्या संसदीय पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा खासदारांना मार्गदर्शन करतील.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा खासदारांना मार्गदर्शन करतील. सोमवारपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ही संसदीय पक्षाची पहिली बैठक आहे. अधिवेशन काळात होणारे कामकाज, पक्षाचे कार्यक्रम व रणनीतीवर चर्चा होईल.
सत्ताधारी पक्षाचे खासदार या बैठकीत रामजन्मभूमी वादात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करू शकतील. मात्र पक्षाकडून व सगळ्या नेत्यांनी राम मंदिरावरून संयम राखण्याचे आवाहन वेगवेगळ्या स्तरावरून केले गेले आहे. तरीही नेत्यांमध्ये मोठा उत्साह असून तो त्यांना आपल्या नेत्यासमोर व्यक्त करायचा आहे, असे समजते. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे असे आहे की, खासदारांना स्पष्ट केले गेले आहे की, अयोध्येवरील निकाल हा पूर्णपणे न्यायालयाचा आहे. त्यात सरकारची कोणतीही भूमिका नाही. न की तो निवाडा कोणत्या अध्यादेशाने दिला गेलेला आहे. म्हणून पंतप्रधान किंवा इतर मंत्र्याचे अभिनंदन करण्याचे काही औचित्य नाही. पक्षाकडून संसदेच्या जीएमसी बालयोगी सभागृहात सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणाºया या बैठकीला सगळ्या खासदारांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनी पक्षाच्या सगळ्या खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जास्तीत जास्त उपस्थित राहण्यास सांगितले आहे.