भाजप-पीडीपी सरकार अवघड

By admin | Published: March 19, 2016 01:34 AM2016-03-19T01:34:09+5:302016-03-19T01:34:09+5:30

भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे काश्मीरमध्ये सरकार बनण्यातील अडथळे वाढत चालले आहेत. शुक्रवारची

BJP-PDP government is difficult | भाजप-पीडीपी सरकार अवघड

भाजप-पीडीपी सरकार अवघड

Next


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे काश्मीरमध्ये सरकार बनण्यातील अडथळे वाढत चालले आहेत. शुक्रवारची बोलणी अयशस्वी ठरली, असे पीडीपीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले, तर पीडीपीच्या नव्या मागण्या मान्य करणे शक्य नाही, असे भाजपचे नेते राम माधव यांनी जाहीर केले.
मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर काश्मीरमध्ये या दोन पक्षांचे सरकार बनू शकलेले नाही. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा सईद सतत नवनव्या अटी घालत असून, त्यामुळे सरकार बनण्यात अडचणी येत असल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत; मात्र मेहबुबा मुफ्ती यांच्या नेमक्या काय अटी आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजप आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष अटी वा मागण्या याबाबत जाहीरपणे काहीही बोलायला तयार नाहीत.
आम्ही कोणत्याही नव्या अटी घातलेल्या नाहीत, मुफ्ती मोहंमद सईद असताना जे ठरले होते, त्या अटीनुसारच सरकार बनवावे, असे आमचे म्हणणे आहे, एवढेच पीडीपीच्या प्रवक्त्याने सांगितले; मात्र पीडीपीच्या नव्या अटी मान्य करणे अशक्य असल्याचे राम माधव यांनी आजच्या चर्चेनंतर स्पष्ट केले. त्यामुळे काश्मीरमध्ये या दोन पक्षांचे सरकार पुन्हा बनणार का, हा प्रश्नच आहे.
या दोन पक्षांना एकत्र येऊन सरकार बनवता येत नसेल, तर राज्यात नव्याने विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी यापूर्वीच केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: BJP-PDP government is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.