रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:42 PM2021-07-14T19:42:05+5:302021-07-14T19:43:07+5:30

आता भाजपने पियूष गोयल यांना प्रमोशन देत मोठी जबाबदारी सोपवली आहे.

bjp piyush goyal appointed leader of house in the rajya sabha replacing thaawarchand gehlot | रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

रेल्वेमंत्रीपदावरून डच्चू मिळालेल्या पियूष गोयल यांना प्रमोशन; भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

googlenewsNext

नवी दिल्ली: अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. तसेच अनेक मोठे फेरबदल करण्यात आले. याशिवाय काही दिग्गज नेते आणि मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून, काही मंत्रालयांमध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे पियूष गोयल. पियूष गोयल यांच्याकडे असलेली रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली असून, आता गोयलांकडे वाणिज्य मंत्रिपद आहे. तसेच त्याचबरोबर टेक्स्टाइल मंत्रालयाचा प्रभार देखील देण्यात आला आहे. मात्र, यानंतर आता भाजपने पियूष गोयल यांना प्रमोशन देत मोठी जबाबदारी सोपवली आहे. (bjp piyush goyal appointed leader of house in the rajya sabha replacing thaawarchand gehlot)

भाजपने केंद्रीयमंत्री पियूष गोयल यांना बढती देत राज्यसभा सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राज्यसभेचे सभागृह नेतेपद दिवंगत अरुण जेटली यांच्याकडे होते. यानंतर ही जबाबदारी थावरचंद गहलोत यांच्यावर सोपवण्यात आली होती. आता या पदावर पियुष गोयल यांची वर्णी लागली आहे. सन २०१० पासून पियुष गोयल राज्यसभेचे सदस्य आहेत.  

देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत असणार आहे. २६ दिवस चालणाऱ्या अधिवेशनात सुट्ट्या वगळता केवळ १३ दिवस प्रत्यक्ष कामकाज होणार आहे. या अधिवेशनात मोदी सरकारकडून सुमारे ३० विधेयके मांडली जाणार आहेत. यामधील १७ विधेयक नवीन असतील, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर पियूष गोयल यांच्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. तसेच पियूष गोयल यांचे विरोधकांची सलोख्याचे आणि चांगले संबंध असल्यामुळे या नेतेपदी त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

दरम्यान, वसाळी अधिवेशनात काँग्रेस कोरोना संकट, लसीकरण, इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी, राफेल, अर्थव्यवस्था, जीएसटी यांसारख्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात असून, काँग्रेस अधीर रंजन चौधरी यांच्या जागेवर राहुल गांधी यांची नियुक्ती लोकसभा नेतेपदी करण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.  
 

Web Title: bjp piyush goyal appointed leader of house in the rajya sabha replacing thaawarchand gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.