BJP Politics: नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना भाजपाचा धक्का, संसदीय बोर्डातून दिला नारळ
By ओमकार संकपाळ | Published: August 17, 2022 02:25 PM2022-08-17T14:25:15+5:302022-08-17T14:31:48+5:30
BJP Politics: भाजपाने आपल्या संसदीय बोर्डामध्ये मोठा बदल केला आहे. नितीन गडकरी यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय बोर्डामधून नारळ देण्यात आला आहे.
नवी दिल्ली - भाजपाने आपल्या संसदीय बोर्डामध्ये मोठा बदल केला आहे. भाजपाने महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि केंद्र सरकारमधील वजनदार मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय बोर्डातून हटवले आहे. नितीन गडकरी यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय बोर्डामधून नारळ देण्यात आला आहे.
भाजपाच्या संसदीय बोर्डातील सदस्यांची नवी कार्यकारिणी आज जाहीर झाली आहे. यामध्ये नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना समितीतून हटवण्यात आले आहे. तर बी. एस. येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल आणि के. लक्ष्मण या नव्या सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
भाजपाच्या संसदीय बोर्डाची नवी कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. जे.पी. नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बी. एस. येडियुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपूरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी. एल. संतोष (सचिव)
New additions to BJP Parliamentary Board - BS Yediyurappa, Sarbananda Sonowal, K Laxman.
— ANI (@ANI) August 17, 2022
The Board, headed by the party's national president JP Nadda, will also have PM Narendra Modi, Defence Minister Rajnath Singh and Union Home Minister Amit Shah. pic.twitter.com/RXbRfDDetz