पाच राज्यांतील निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी, भाजपची तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:45 AM2021-06-29T10:45:14+5:302021-06-29T10:46:23+5:30
सहा चिंतन शिबिरांतून होणार केंद्र सरकारच्या निर्णयांची चर्चा
नितीन अग्रवाल / शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने या राज्यात संघटना मजबूत करणे आणि प्रलंबित योजना निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यावर भर दिला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील प्रलंबित विकास योजनांबाबत सातत्याने केंद्रीय मंत्र्यांकडून माहिती घेत आहेत. पक्षाच्या मुख्यालयात शनिवारी नड्डा यांनी केंद्रीयमंत्री राजनाथसिंह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान आणि किरन रिजिजू यांच्याशी चर्चा केली.
पक्षाकडून प्रत्येक राज्यातील माहिती घेतली जात आहे. संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी उत्तर प्रदेश, अरुण सिंह यांनी उत्तराखंड, दुष्यंत गौतम यांनी पंजाब, सीटी रवि यांनी गोवा आणि दिलीप सेकिया यांनी मणिपूरबाबतीत माहिती दिली. बूथ आणि मंडळ स्तरावर समितीचे पुनर्गठन करण्याचे निर्देश सर्व राज्यांचे प्रभारी यांना देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात कोण कुणासोबत?
nउत्तर प्रदेशात कोण कुणासोबत उत्तर प्रदेशात सपा आणि काँग्रेसला बाजूला करण्यासाठी
नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूला बिहारमधून उत्तर प्रदेशात आणण्यासाठी भाजप डावपेच आखत आहे. जेणेकरुन, उत्तर प्रदेशातील कुर्मी वोट बँकेला सपा आणि काँग्रेसकडे जाण्यापासून रोखता येईल. जदयूचे नेते के. सी. त्यागी यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, जेडीयू
भाजपासोबत आघाडी करु शकतो. पण, जेडीयूला किती जागा मिळतील यावर हे अवलंबून आहे.
nअशीही चर्चा आहे की, बसपा प्रमुख मायावती थेट भाजपाशी आघाडी करणार नाहीत. पण, त्यांचा प्रयत्न भाजपासोबत रणनीतीच्या दृष्टीने सुसंगत पाऊल टाकण्याचा आहे. राज्यात बसपाची स्थिती काँग्रेसपेक्षा खराब आहे. तर, कोणताही पक्ष काँग्रेससोबत आघाडी करायला तयार नाही. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
nकाँग्रेसच्या आशा सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावरच आहेत. प्रियांका गांधी जुलैपासूनच लखनौमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. सपाने राष्ट्रीय लोकदलासोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यांक मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपा प्रयत्नात आहेत.