कर्नाटकसाठी भाजपची जोरदार तयारी; येडियुरप्पा, प्रधानांवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:54 AM2023-02-05T06:54:10+5:302023-02-05T06:54:29+5:30

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका एप्रिलच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या राज्यात भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले.

BJP prepares hard for Karnataka; big responsibility on Pradhan and Yeddyurappa | कर्नाटकसाठी भाजपची जोरदार तयारी; येडियुरप्पा, प्रधानांवर मोठी जबाबदारी

कर्नाटकसाठी भाजपची जोरदार तयारी; येडियुरप्पा, प्रधानांवर मोठी जबाबदारी

Next

संजय शर्मा -

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील राज्यांपैकी फक्त कर्नाटकमध्येच भाजपचे सरकार आहे. तिथे आगामी विधानसभा निवडणुकासाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पक्षप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली तर या निवडणुकांच्या रणनीतीची सर्व सूत्रे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपविली. कर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपने ही पावले उचलली आहेत.

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका एप्रिलच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या राज्यात भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले. मात्र ते आपल्या कामकाजातून जनतेवर प्रभाव पाडू शकले नाहीत. बोम्मई हे लिंगायत समाजाचे असल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविणे हे भाजपला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे भाजपने बी. एस. येडियुरप्पा या अनुभवी नेत्याकडे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांची सूत्रे सोपविली आहेत. तर या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रभारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील, असे पक्षाला वाटते.

तिरंगी लढतीची शक्यता
काँग्रेसमध्ये डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनण्यासाठी स्पर्धा आहे. जनता दल सेक्यूलर हा पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप, काँग्रेस, जनता दल सेक्यूलर यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 

हेलिकॉप्टर प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
कर्नाटकमधील तुमकुरू येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) प्रकल्पात ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या सोमवारी उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पात हलक्या वजनाची हेलिकॉप्टर बनविली जातील. उज्ज्वला योजनेनंतर घरोघरी सौर चुली वितरित करण्याच्या योजनेचा तसेच प्लास्टिक बाटल्यांपासून कापड तयार करण्याच्या प्रकल्पाचे मोदी उद्घाटन करण्यात येईल. 

Web Title: BJP prepares hard for Karnataka; big responsibility on Pradhan and Yeddyurappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.